आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत ट्रीटमेंट घेत असताना एन्जॉय करत आहेत सोनाली बेंद्रे, ऋषी कपूर, दिसले अनुपम खेरसोबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 43 वर्षांची सोनाली बेंद्रे न्यूयॉर्कमध्ये कँसरवर ट्रीटमेंट घेत आहे. याच काळात ती आपले आयुष्यही एन्जॉय करत आहे. सोमवारी ती पती गोल्डी बहल, मित्र अनुपम खेर आणि फ्रेंड रुपासोबत डिनरवर दिसली. दरम्यान ऋषी कपूरही अमेरिकेत त्यांच्या आजारावर उपचार घेत आहेत. तेसुध्दा एका फोटोमध्ये सोनाली बेंद्रेसोबत दिसत आहेत. त्यांच्यासोबत पत्नी नीतू कपूरही आहेत. तर अनुपम खेर यांनी डिनरचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहे. त्यांनी लिहिले की, "प्रेशर असताना आनंदी राहणे यामुळे ती निडर आहे. खुप सुंदर, साहसी आणि प्रेरणादायी सोनाली बेंद्रे, तिचा पती गोल्डी बहल आणि नेहमी सहत राहणा-या रुपासोबत डिनर करणे अद्भुत अनुभव होता."


- फोटोज लक्षपुर्वक पाहिले तर एकामध्ये अनुपम आणि सोनाली दोघंही बाल्ड लूकमध्ये दिसत आहेत. तर इतर दोन फोटोंमध्ये त्यांनी ब्लॅक कॅप घातली आहे. सोमवारी सोनाली पती गोल्डी बहलसोबत ऋषी कपूर यांना पाहण्यासाठीही गेली होती. ते 29 सप्टेंबरपासून येथे उपचार घेत आहेत. रिपोर्ट्समध्ये त्यांना कँसर असल्याचे बोलले जात आहे. परंतु त्यांचा मोठा भाऊ रणधीर कपूर यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. तर सोनालीने स्वतः जुलैमध्ये तिला कँसर असल्याचा खुलासा केला होता. परंतु तिला कोणत्या टाइपचा कँसर झालेला आहे, हे अजून समोर आलेले नाही. 

 

प्रत्येक विकेंडला भेटतात सेनाली आणि अनुपम 
- अनुपम सोनाली प्रत्येक वीकेंडला भेटतात. काही दिवसांपुर्वी सोनालीने त्यांना मेंशन करत लिहिले होते की, "फक्त या शोमध्ये वीकेंड्सला मला कंपनी मिळते. आम्ही नेहमीच घरी कोण पहिले जाणार याविषयी बोलत असतो. मला आशा आहे की, ती मीच असणार. प्रार्थना करते की, त्यांचा शो अनेक सीजन असाच सुरु राहावा." अनुपम अमेरिकन मेडिकल ड्रामा 'Bellevue' मध्ये डॉ. अनिल कपूर यांची भूमिका साकारत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...