Home | News | Sonali Bendre Celebrates Diwali In New York

कँसरवर उपचार घेत असलेल्या सोनालीने पती आणि मुलासोबत अमेरिकेत साजरी केली दिवाळी, केली इमोशनल पोस्ट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 11:22 AM IST

कँसरमुळे केस गळाले तर सोनालीने पूजेदरम्यान घातला विग

 • Sonali Bendre Celebrates Diwali In New York

  न्यूयॉर्क. कँसरवर उपचार घेत असलेल्या सोनाली बेंद्रेने न्यूयॉर्कमध्ये दिवाळी पूजा केली. सोशल मीडियावर तिने आपल्या या पूजेचे फोटोज शेअर केले आहे. यामध्ये तिचे पती गोल्डी बहल आणि मुलगा रणवीर बहल न्यूयॉर्कमध्ये पोहोचले होते. सोनालीने फोटोजसोबत एक इमोशनल लेटर लिहिले आहे.


  सोनालीने लिहिले - आमच्याजवळ भारतीय कपडे नव्हते...
  - सोनालीने लिटेरमध्ये लिहिले की, "न्यूयॉर्कमधील दिवाळी मुंबईच्या तुलनेत उशीरा साजरी केली जाते. यामुळे उशिला विश केले. हे खुप अपरंपरागत होते... आमच्याकडे भारतीय कपडे नव्हते. आम्ही लहानशी पूजा ठेवली होती, पण ती मनापासून होती. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी चांगले आरोग्य, धन आणि समृध्दीयुक्त जावो."

  कँसरमुळे गळाले केस तर लावले विग
  - दिवाळीच्या पूजेचे फोटोज सोनालीने शेअर केले आहे यामध्ये तिने विग घातल्याचे दिसतेय. कँसरवरील उपचारांमुळे सोनालीचे केस गळाले आहे. याचा खुलासा सोनालीने ऑगस्टमध्येच केला होता. अक्टोबरमध्ये तिने काही फोटोज शेअर केले होते, यामध्ये तिच्या डोक्यावर केस दिसत होते. सोनालीने या फोटोला कॅप्शन देत लिहिले होते की, "कधी-कधी वाईट प्रसंगी आपल्याला शानदार लोक मिळतात, ते अनोळखी असतात, पण लवकरच आपले मित्र बनतात. असेच काही मला मिळाले आहे. जे एक चांगले हेअरस्टायलिस्ट आणि विगमेकर आहेत." सोनालीचे केस गळाले असले तरीही ती सतत आपल्या लुक्सविषयी नवीन-नवीन एक्सपेरिमेंट करत असते. सोनाली कधी कॅप घालून तर कधी डिफरेंट विगसोबत आपले कूल लुक्स शेअर करत असते. ती जुलैपासून न्यूॉर्कमध्ये कँसरवर उपचार घेत आहे.

 • Sonali Bendre Celebrates Diwali In New York
 • Sonali Bendre Celebrates Diwali In New York

Trending