आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम कदम बोलून पुन्हा फसले, या प्रसिध्द अभिनेत्रीला वाहिली श्रध्दांजली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कँसरवर उपचार घेत आहे. परंतू सध्या सोनालीच्या निधनाच्या अफवा पसरत आहेत. सध्या वादात अडकलेले भाजपचे आमदार राम कदम यांनी सोनाली हिला ट्वीटवर श्रध्दांजली वाहिली आहे. यामुळे ते आता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. ‘पसंत असलेली मुलगी सांगा, आम्ही तिला पळवून आणू,’ असे बेताल वक्तव्य भाजपचे आमदार राम कदमांनी केले होते.  पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. परंतू सोनाली सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. ती सुखरुप आहे. तिच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत.

 

नंतर ट्वीट केले एडिट
भाजपचे आमदार राम कदमांनी नंतर हे ट्वीट एडिट केले. आता त्यांनी "About Sonali Bendre ji   It was rumour . Since last two days .. I pray to God for her good health & speedy recovery" असे ट्वीट केले आहे. 

 

आजारपणातही भरभरून आयुष्य जगतेय सोनाली 
कँसरशी झुंद देणारी सोनाली अडचणीच्या काळातही भरभरून आयुष्य जगतेय. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फोटो शेअर करत असते. नुकताच तिचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये सोनाली बाल्ड लूकमध्ये सुंदर हास्य करताना दिसतेय. हा फोटो स्वतः सोनालीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या हातात एक पुस्तकही आहे. पुस्तकाचे टायटल 'ए जेंटलमॅन इन मॉस्को' असे आहे. सोनालीने फोटोसोबत लिहिले- "आज पुस्तक वाचायचा दिवस आहे. हे एक हिस्टोरिकल फिक्शन आहे. मी हे वाचण्यासाठी जास्त प्रतिक्षा करु शकत नाही." सोनाली सध्या आयुष्यातील वाईट परिस्थितीचा सामना करत आहे. परंतू तरीही तिच्या चेह-यावरील हास्य कँसरला मात देताना दिसतेय.

 

बातम्या आणखी आहेत...