आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonali Bendre During Cancer Treatment Reading Lots Of Book: Sonali Said She Have Lots Of Best Friends In The World

कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या सोनाली बेंद्रेचा नवीन फोटो, ओळखणे झाले कठीण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या अमेरिकेत कर्करोगाशी दोन हात करत आहे. पण वेळोवेळी ती आपल्या चाहत्यांना तब्येतीविषयीचे अपटेड्स देत आहे. उपचारांसोबतच सोनली तिच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत वेळ घालवत आहे. शिवाय बरीच पुस्तकेही वाचत आहे. सोनालीचा एक नवीन फोटो समोर आला आहे, यामध्ये ती एका बुक स्टोअरमध्ये दिसत आहे. सोनाली या फोटोत व्हाइट शर्टमध्ये दिसत असून तिने डोक्यावर एक कॅप घातली आहे आणि तिच्या हातात एक पुस्तक दिसत आहे. या फोटोत खरं तर सोनालीला प्रथमदर्शनी ओळखणे कठीण झाले आहे. कॅन्सरवर उपचार सुरू असल्याने सोनालीने याआधी केस कापले होते. मात्र, आता तिने पूर्ण टक्कल केले आहे. केमोथेरपीच्या पार्श्वभूमीवर तिने तसे केले आहे. सोनाली एक लेखिकादेखील आहे. तिला तिच्या काही मित्रांनी पुस्तके गिफ्ट केली आहे, ज्यासाठी तिने मित्रांचे आभार व्यक्त केले आहेत. 

 

बुक लव्हरसोबतच लेखिकासुद्धा आहे सोनाली 
- अभिनेत्रीसोबतच सोनाली एक बुक लव्हर आणि लेखिकासुद्धा आहे. आई झाल्यानंतर सोनालीने तिच्या अनुभवांना पुस्तकाचे रुप दिले होते. या पुस्तकाचे नाव 'द मॉडर्न गुरुकुल : माय एक्सपेरिमेंट विद पेरेंटिंग' असे आहे.

 

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सोनालीने लिहिले होती इमोशनल पोस्ट
- अलीकडेच सोनालीची भेट घेण्यासाठी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन, सुझान खान आणि गायत्री जोशी पोहोचले होते. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सोनालीने तिच्या मैत्रिणींसोबतचा एक फोटो शेअर केला होता.
- हा फोटो सोनालीने ट्विट करत या सोबत फ्रेंडशिप डे बद्दल एक पोस्टही लिहीली होती. 'या क्षणी लोक मला मी खुश आहे म्हटल्यावर विचित्र नजरेने बघतात. पण हे खरे आहे की मी आनंदात आहे आणि त्याचं कारण म्हणजे, मी आता प्रत्येक क्षण, येणारी संधी यात आनंद शोधत आवर्जुन त्याकडे लक्षं देत आहे. हे खरे आहे की काही क्षण माझ्यासाठी वेदनांचे असतात. पण मी सध्या मला आवडेल ते करत आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसोबत मी वेळ घालवते आहे. मी माझ्या मित्रमैत्रिणींची खुप आभारी आहे. ते माझे आधारस्तंभ आहे. जे या क्षणी माझ्यासाठी इथे आहेत आणि या सगळ्यातून मला बाहेर येण्यास मदत करत आहे. त्यांच्या व्यस्त जीवनीतून ते माझ्यासाठी कॉल, मेसेज, भेट या माध्यमांतून वेळ काढत आहे. मला एकटं वाटेल असा एकही क्षण ते येऊ देत नाहीत. मी त्यांचे आभारी आहे की त्यांनी मला खरी मैत्री दाखवली. हॅपी फ्रेंडशिप डे.' ह्रतिक रोशन याने हा फोटो कॅमेरात कैद केला होता. 'हल्ली मला तयार व्हायला फार वेळ लागत नाही. कारण, केसांमुळं उडणारा गोंधळ आता होत नाही,' असेही तिने गमतीने म्हटले होते. 

 

सोनालीच्या नणंदेने दिली होती तब्येतीची माहिती...

- सोनालीची नणंद सृष्टी बहलने सोनालीच्या तब्येतीची माहिती दिली होती. सृष्टीने लिहिले होते, "She is staying strong". माझी वहिनी धीराने कॅन्सरशी लढा देत असल्याचे ती म्हणाली होती.

 

सोशल मीडियावरुन स्वतः दिली होती कॅन्सरची बातमी...

सोनालीने आपल्या ट्विटर तसंच इन्स्टा अकाऊंटवरुन एक भावनिक पोस्ट लिहून कॅन्सरची बातमी सगळ्यांना दिली होती. तिने लिहिले होते, ''कधी कधी आयुष्यात अनपेक्षित वळणं येतात, ज्याबाबत आपण कधीही विचार केलेला नसतो. मला हायग्रेड कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार मला आजाराविरोधात लढण्याचे बळ देताहेत. या गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी मी न्यूयॉर्कला आले आहे. सतत शारीरिक वेदना होत असल्याच्या कारणामुळे काही वैद्यकीय तपासण्या केल्या.  यामध्ये मला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या आजाराला सामोरं जाण्यासाठी मी सज्ज आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत''. 

बातम्या आणखी आहेत...