आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम कदमांच्या त्या ट्वीटनंतर आता बेंद्रेच्या पतीची प्रतिक्रिया, केले ट्वीट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कँसर या गंभीर आजाराचा सामना करतेय. सध्या ती न्यूयॉर्कमध्ये कँसरवर उपचार घेत आहे. ती सध्या सुखरुप आहे. परंतू गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या निधनाच्या अफवा पसरवल्या जात आहे. यातच भाजपचे आमदार राम कदमांनीही ट्वीट करुन तिला श्रध्दांजली वाहिली होती. या खोट्या ट्वीटमुळे त्यांना सोशल मीडियावर चांगलच धारेवर धरण्यात आलं. सर्वांनी ट्रोल केल्यानंतर त्यांनी ते ट्वीट काढून टाकलं. परंतू आता पहिल्यांदाच यावर तिच्या कुटूंबियांची प्रतिक्रिया आली आहे. 

 

गोल्डी बहलने केले हे ट्विट

पती गोल्डी बहलने म्हणाला, 'मी सर्वांना आवाहन करतो की सोशल मीडियाचा उपयोग जबाबदारीने करा. अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच पसरवूही नका. विनाकारण आपण लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवतो. धन्यवाद' असे ट्वीट त्याने केले. 

 

आजारपणातही भरभरून आयुष्य जगतेय सोनाली 
कँसरशी झुंद देणारी सोनाली अडचणीच्या काळातही भरभरून आयुष्य जगतेय. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फोटो शेअर करत असते. नुकताच तिचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये सोनाली बाल्ड लूकमध्ये सुंदर हास्य करताना दिसतेय. हा फोटो स्वतः सोनालीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या हातात एक पुस्तकही आहे. पुस्तकाचे टायटल 'ए जेंटलमॅन इन मॉस्को' असे आहे. सोनालीने फोटोसोबत लिहिले- "आज पुस्तक वाचायचा दिवस आहे. हे एक हिस्टोरिकल फिक्शन आहे. मी हे वाचण्यासाठी जास्त प्रतिक्षा करु शकत नाही." सोनाली सध्या आयुष्यातील वाईट परिस्थितीचा सामना करत आहे. परंतू तरीही तिच्या चेह-यावरील हास्य कँसरला मात देताना दिसतेय.

बातम्या आणखी आहेत...