आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonali Bendre Share Nostalgic Photos And Emotional Post On Her Son Ranveer Thirteen Birthday

मुलाला मिस करतेय सोनाली, 13 व्या बर्थडेला लिहिली इमोशनल पोस्ट, म्हणाली- तुझा पहिला वाढदिवस, जेव्हा मी तुझ्यासोबत नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री सोनाली बेंद्रेवर सध्या यूएसमध्ये कॅन्सरवर उपचार सुरु आहे. आज तिचा मुलगा रणवीरचा 13 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सोनालीने एक इमोशनल मॅसेज पोस्ट केला. शिवाय सोबतच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सोनाली आणि तिच्या मुलाचे काही फोटोज आहेत. सोनालीचा मुलगा रणवीरचा हा पहिला असा वाढदिवस आहे, जेव्हा ती त्याच्यासोबत नाही. 


मुलाला मिस करतेय सोनाली बेंद्रे... 

- सोनालीने इमोशनल मेसेजमध्ये लिहिले, "रणवीर तू माझा सूर्य, चंद्र, तारा आणि आकाश आहेस... कदाचित मी थोडी मेलोड्रॅमॅटिक होतेय. तुझा 13 वा वाढदिवस हे डिझर्व करतं." 

- "मस्तच... अखेर तू टीनएजर झाला आहेत. तू मोठा झाला आहेस, हे समजून घ्यायला मला थोडा वेळ हवा आहे. मी सांगू शकत नाही, मला तुझा किती अभिमान वाटतोय." 
- "हॅप्पी बर्थडे my not-so-little one... असं पहिल्यांदाच होतंय, जेव्हा मी तुझ्यासोबत नाहीये. मी तुला खूप मिस करतेय. तुला माझ्याकडून खूप खूप प्रेम आणि biiiiig hug।"

 

सध्या पुस्तकांसोबत वेळ घालवतेय सोनाली... 

उपचारांसोबतच सोनली बरीच पुस्तकेही वाचत आहे. सोनालीचा एक नवीन फोटो समोर आला आहे, यामध्ये ती एका बुक स्टोअरमध्ये दिसत आहे. सोनाली या फोटोत व्हाइट शर्टमध्ये दिसत असून तिने डोक्यावर एक कॅप घातली आहे आणि तिच्या हातात एक पुस्तक दिसत आहे. या फोटोत खरं तर सोनालीला प्रथमदर्शनी ओळखणे कठीण झाले आहे. कॅन्सरवर उपचार सुरू असल्याने सोनालीने याआधी केस कापले होते. मात्र, आता तिने पूर्ण टक्कल केले आहे. केमोथेरपीच्या पार्श्वभूमीवर तिने तसे केले आहे. सोनाली एक लेखिकादेखील आहे. तिला तिच्या काही मित्रांनी पुस्तके गिफ्ट केली आहे, ज्यासाठी तिने मित्रांचे आभार व्यक्त केले आहेत.
- अभिनेत्रीसोबतच सोनाली एक बुक लव्हर आणि लेखिकासुद्धा आहे. आई झाल्यानंतर सोनालीने तिच्या अनुभवांना पुस्तकाचे रुप दिले होते. या पुस्तकाचे नाव 'द मॉडर्न गुरुकुल : माय एक्सपेरिमेंट विद पेरेंटिंग' असे आहे.

 

सोनालीच्या नणंदेने दिली होती तब्येतीची माहिती...
- सोनालीची नणंद सृष्टी बहलने सोनालीच्या तब्येतीची माहिती दिली होती. सृष्टीने लिहिले होते, "She is staying strong". माझी वहिनी धीराने कॅन्सरशी लढा देत असल्याचे ती म्हणाली होती.

 

सोशल मीडियावरुन स्वतः दिली होती कॅन्सरची बातमी...
सोनालीने आपल्या ट्विटर तसंच इन्स्टा अकाऊंटवरुन एक भावनिक पोस्ट लिहून कॅन्सरची बातमी सगळ्यांना दिली होती. तिने लिहिले होते, ''कधी कधी आयुष्यात अनपेक्षित वळणं येतात, ज्याबाबत आपण कधीही विचार केलेला नसतो. मला हायग्रेड कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार मला आजाराविरोधात लढण्याचे बळ देताहेत. या गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी मी न्यूयॉर्कला आले आहे. सतत शारीरिक वेदना होत असल्याच्या कारणामुळे काही वैद्यकीय तपासण्या केल्या. यामध्ये मला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या आजाराला सामोरं जाण्यासाठी मी सज्ज आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत''.

 

बातम्या आणखी आहेत...