आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा कॅन्सर झाला एका महिलेने ६ महिने केली सोनालीची सेवा, वेळेवर जेवण आणि औषधी दिली, बाहेर जाण्या-येण्याची देखील घेतली काळजी, आता सोनालीने पोस्टद्वारे मानले आभार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : मागील सहा महिन्यांपासून सोनाली बेंद्रे न्यूयॉर्क सिटीमध्ये कर्करोगावर उपचार घेत होती. तिला कर्करोग झाला असल्याचे तिनेच सोशल मीडियावर सगळ्यांना सांगितले होते. सोनालीला हाय ग्रेड कॅन्सर मेटास्टॅटिस झाला होता. त्यामुळे सोनालीला उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला जावे लागणार होते. तेव्हा सोनालीची बाहीण रूपा रणदिवे आणि सोनालीचा नवरा गोल्डी बहाल हे दोघे तिच्यासोबत  न्यूयॉर्कला गेले होते. सोनालीच्या कुटुंबाने तिची यादरम्यान खूप साथ दिली. 

 

उपचार घेऊन परतल्यावर सोनालीने बहीण रूपासाठी इंस्टाग्रामवर एक इमोशनल पोस्ट शेअर केली. सोनालीने त्यात लिहिले आहे, "मोठी बहीण मैत्रीण तर असतेच पण संरक्षण करणारी, ऐकून घेणारी, समजावून सांगणारी आणि सुख दुःख वाटून घेणारी एक जवळची व्यक्ती असते. आणि ताई हे सर्व तर आहेच पण त्यापेक्षाही खूप जास्त आहे. ताई सगळेकाही सोडून सहा महिने न्यूयॉर्कला माझ्यासोबत राहिली. ती माझ्यासाठी माझा भक्कम आधार बनली. मी न्यूयॉर्कला जाण्याचे ठरवले तेव्हापासून रूपा ताई माझ्यासोबत आहे. तिने माझ्या औषधी खाण्या-पिण्याचे सर्व काही खूप काळजीने सांभाळले जेव्हा केव्हा मला गरज पडली तिने मला समजावून सांगितले आणि कधी मला हवे असल्यास माझ्या विचारांसोबत एकटेही सोडले.  तिने सगळ्या पद्धतीने माझी काळजी घेतली. आम्ही आता घरी आलो आहोत आपापल्या कुटुंबासोबत. पण न्यूयॉर्कमधल्या त्या सगळ्या दिवसांसाठी मी तिची नेहमीच ऋणी राहीन." 

 

सोनाली आता आपल्या घरी परत आली आहे. भारतात परतल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. सोनालीच्या पतीने सांगितले की, तिची प्रकृती आता चांगली आहे. तिचा कॅन्सर बरा झाला आहे. पण आजार पुन्हा होऊ शकतो म्हणून रेग्युलर चेक अप करावे लागणार आहे. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

"An older sister is a friend and defender – a listener, conspirator, a counselor and a sharer of delights. And sorrows too. – Pam Brown" Rupa Tai has been all this and more. She dropped everything in a heartbeat to be with me on this journey. She has been my rock...my person... Rupa Tai was involved in my journey from when I was diagnosed to the time I was deciding the course of treatment to packing her bags and coming with me to New York. She was there from get-go. Her transition from one role to another was seamless. A dictator when I needed to eat right or take my meds or an empathetic counselor alternating between giving advice and offering silent support when all I needed was to be alone with my thoughts. She was around. She was with me and by me, at all times. Sisters share a special relationship. We are literally an extension of each other. For bad days, her presence did the trick and the good days...well, it just got better! We have now returned home - to our respective families and lives, but us together in New York for those 6 months...I am forever indebted... #SwitchOnTheSunshine #OneDayAtATime @ranadiverupa

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre) on Dec 6, 2018 at 5:51am PST

 

बातम्या आणखी आहेत...