आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई: सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कँसरवर उपचार घेत आहे. काही दिवसांपुर्वी सोनालीने मुलगा रणवीरच्या 13 व्या वाढदिवशी एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. आता रणवीरने सोशल मीडिया अकाउंटवर एक पॉझिटिव्ह पोस्ट केली आहे. फोटोमध्ये रणवीर एका चमकदार रिंगमध्ये दिसतोय. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "तुम्ही सर्व लोकांनी माझ्या आजुबाजूला नेहमची एक लाइटची रिंग बनवून ठेवली आहे. ज्या सर्व लोकांनी मला सपोर्ट केला त्याचे मला आभार मानायचे आहेत." हा फोटो रणवीरच्या 13 व्या बर्थडे सेलिब्रेशनचा आहे.
मुलाच्या वाढदिवसाला उपस्थित राहू शकली नाही सोनाली
सोनालीने मुलच्या वाढदिवसापुर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत सोनाली आणि तिच्या मुलाचे काही फोटोज होते. सोनालीचा मुलगा रणवीरचा हा पहिला असा वाढदिवस होता, ज्यावेळी ती उपस्थित नव्हती.
सोनालीने लिहिली होती इमोशनल पोस्ट
- सोनालीने इमोशनल मेसेजमध्ये लिहिले, "रणवीर तू माझा सूर्य, चंद्र, तारा आणि आकाश आहेस... कदाचित मी थोडी मेलोड्रॅमॅटिक होतेय. तुझा 13 वा वाढदिवस हे डिझर्व करतं."
- "मस्तच... अखेर तू टीनएजर झाला आहेत. तू मोठा झाला आहेस, हे समजून घ्यायला मला थोडा वेळ हवा आहे. मी सांगू शकत नाही, मला तुझा किती अभिमान वाटतोय."
- "हॅप्पी बर्थडे my not-so-little one... असं पहिल्यांदाच होतंय, जेव्हा मी तुझ्यासोबत नाहीये. मी तुला खूप मिस करतेय. तुला माझ्याकडून खूप खूप प्रेम आणि biiiiig hug।"
सध्या पुस्तकांसोबत वेळ घालवतेय सोनाली...
उपचारांसोबतच सोनली बरीच पुस्तकेही वाचत आहे. सोनालीचा एक नवीन फोटो समोर आला आहे, यामध्ये ती एका बुक स्टोअरमध्ये दिसत आहे. सोनाली या फोटोत व्हाइट शर्टमध्ये दिसत असून तिने डोक्यावर एक कॅप घातली आहे आणि तिच्या हातात एक पुस्तक दिसत आहे. या फोटोत खरं तर सोनालीला प्रथमदर्शनी ओळखणे कठीण झाले आहे. कॅन्सरवर उपचार सुरू असल्याने सोनालीने याआधी केस कापले होते. मात्र, आता तिने पूर्ण टक्कल केले आहे. केमोथेरपीच्या पार्श्वभूमीवर तिने तसे केले आहे. सोनाली एक लेखिकादेखील आहे. तिला तिच्या काही मित्रांनी पुस्तके गिफ्ट केली आहे, ज्यासाठी तिने मित्रांचे आभार व्यक्त केले आहेत.
- अभिनेत्रीसोबतच सोनाली एक बुक लव्हर आणि लेखिकासुद्धा आहे. आई झाल्यानंतर सोनालीने तिच्या अनुभवांना पुस्तकाचे रुप दिले होते. या पुस्तकाचे नाव 'द मॉडर्न गुरुकुल : माय एक्सपेरिमेंट विद पेरेंटिंग' असे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.