आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

''तू जे माझ्यासाठी केले त्यासाठी थँक्स हा शब्द अतिशय लहान आहे'', 16व्या वेडिंग अॅनिव्हर्सरीला कॅन्सरशी लढा देत असलेल्या सोनालीने नव-यासाठी लिहिले इमोशनल पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने तिच्या 16 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पती गोल्डी बहलसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. सोबतच एक इमोशनल लेटरही लिहिले आहे. सोनालीने लिहिले, "जेव्हा मी हे लिहिणे सुरु केले, तेव्हा सुरुवाताीपासूनच माझ्या मनात असलेले इमोशन्स आणि विचार कागदावर उतरवणे सोपे नाही, हे मला ठाऊक होते." 


सोनालीने लिहिले, कॅन्सर असा आजार आहे, ज्यातून संपूर्ण कुटुंबाला जावं लागतं... 
- सोनालीने तिच्या पत्रात लिहिले, "हसबंड, सोबती, बेस्ट फ्रेंड, माय रॉक... माझ्यासाठी गोल्ड बहल हे सर्व काही आहे. लग्न म्हणजे एकमेकांसोबत कायम उभे राहणे, चांगल्या वाईट काळात एकमेकांची साथ देणे, एवढी वर्षे आम्ही असेच राहिलो. कॅन्सरशी फक्त एक व्यक्ती नव्हे तर संपूर्ण कुटूंब लढत असतं."

 

- सोनालीने पुढे लिहिले,"मी याच्याशी लढण्यास सक्षम होती. कारण मला ठाऊक होतं, की तू सर्व जबाबदा-या सांभाळशील. धन्यवाद, प्रत्येक पावलावर माझी  स्ट्रेंथ, माझे प्रेम आणि माझा आनंद होण्यासाठी. मी जे अनुभवतेय, त्यासाठी थँक्स हा अगदी छोटा शब्द आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी गोल्डी"

 

2002 मध्ये झाले होते लग्न... 
- सोनालीने 12 नोव्हेंबर 2002 रोजी गोल्डी बहलसोबत लग्न केले होते. गोल्डी चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी 'अंगारे' (1998), ''द्रोणा' (2008) आणि 'यू मी और हम' (2013) या चित्रपटांची िनर्मिती केली. याशिवाय छोट्या पडद्यावरील 'रिपोर्टर्स' (2015) आणि 'आरंभ' (2017) हे शोज डायरेक्ट आणि प्रोड्यूस  केले. सोनाली आणि गोल्डी यांना 13 वर्षांचा एक मुलगा आहे. जुलै महिन्यात सोनालीने तिला कॅन्सर झाल्याचा खुलासा केला होता. तेव्हापासून ती न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे.  

बातम्या आणखी आहेत...