आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

 सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच साकारतेय रहस्यपट, अवघ्या 20 दिवसांत झाले शूटिंग    

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

'विकी वेलिंगकर' या आगामी मराठी चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिका साकारत आहे.  त्यानिमित्त तिच्याशी झालेला हा खास संवाद -

  • तुझ्या भूमिकेविषयी काही सांग ?

मी विकी नावाची भूमिका साकारतेय. ती एक कॉमिक्स बूक आर्टिस्ट आहे. तिच्या कॉमिक्स बुक कोणी वाचत नाहीत आणि ते विकलेही जात नाहीत. ही सामान्य मुलगी एका असामान्य परिस्थितीमध्ये अडकते. कोणी तरी तिचा सतत पाठलाग करतो आहे, असे तिला जाणवते.

  • स्पृहा जोशीबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?

आम्ही दोघींना पहिल्यांदाच एकत्र काम केल्याचा मला आनंद आहे. चित्रीकरणादरम्यान आम्ही दोघी जवळच्या मैत्रिणी झालो. दोघींनाही खूप मजा आली. कथा खूप वेगळी असून अशा प्रकारच्या कथेमध्ये पहिल्यांदाच काम केले. स्पृहा गुणी अभिनेत्री असून तिच्याबरोबर परत काम करायला नक्की आवडेल.

  • सौरभ वर्मासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

सौरभ वर्मा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले. त्यांचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. याची कथा मी तुलाच डोळ्यासमोर ठेवून लिहिली आहे, त्यामुळे यात तू काम केले पाहिजे असे ते म्हणाले. त्यांनी या कथेला न्याय दिला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमाचे शूटिंग 20 दिवसांत पूर्ण झाले.

  • मास्क मॅन पात्राबद्दल काय सांगशील?

'मास्क मॅन' ही संकल्पना पहिल्यांदाच मराठी सिनेमामध्ये पाहायला मिळतेय. रहस्यपटामध्ये टप्प्याटप्प्याला येणारे धक्के खूप महत्त्वाचे असतात. अजून जाणून घ्यायचे असेल तर चित्रपट पाहा.

बातम्या आणखी आहेत...