Home | Bollywood | Marathi Cinekatta | Sonali Kulkarni to play Sulochana Didi in Aani... Dr. Kashinath Ghanekar

POSTER:‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’मध्ये सुलोचना दीदींच्या भूमिकेत सोनाली, डॉ. लागूंच्या भूमिकेत असेल हा अॅक्टर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 11, 2018, 12:02 PM IST

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात सुलोचना दीदींची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

 • Sonali Kulkarni to play Sulochana Didi in Aani... Dr. Kashinath Ghanekar
  अभिनेत्री सुलोचना दीदींच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी

  मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा विलक्षण प्रवास ‘आणि... डॉ.काशिनाथ घाणेकर’या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या सिनेमाची पहिली झलक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आली होती. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे डॉ. काशिनाथ घाणेकरांची भूमिका साकारणार आहे. आता हळूहळू या चित्रपटातील एकएक पात्र उलगडली जात आहेत. या चित्रपटाच अभिनेता सुमित राघवन डॉ. श्रीराम लागूंच्या भूमिकेत झळकणार असून त्याचीही झलक अलीकडेच दाखवण्यात आली. आता या चित्रपटातील आणखी एक महत्त्वाचे पात्र म्हणजे अभिनेत्री सुलोचना लाटकर. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात सुलोचना दीदींची व्यक्तिरेखा साकारणार आहे. सुलोचना दीदी या डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या सासूबाई आहेत.

  1960 च्या दशकावर आधारीत असलेल्या “आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर” या चित्रपटात या अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे. त्यांनी मराठी रंगभूमीचा चेहेरामोहरा नाट्यमयरित्या बदलून टाकला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे. प्रेक्षकांच्या शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जगणाऱ्या रंगभूमीच्या सम्राटाचे आयुष्य येत्या दिवाळीत म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी मोठया पडद्यावर उलगडणार आहे.

  पुढील स्लाईड्सवर बघा, चित्रपटाचे आतापर्यंत रिलीज झालेले पोस्टर...

 • Sonali Kulkarni to play Sulochana Didi in Aani... Dr. Kashinath Ghanekar
  डॉ. श्रीराम लागूंच्या भूमिकेत अभिनेता सुमित राघवन
 • Sonali Kulkarni to play Sulochana Didi in Aani... Dr. Kashinath Ghanekar
  डॉ. काशिनाथ घाणेकरांच्या भूमिकेत अभिनेता सुबोध भावे

Trending