आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'या' शोमध्ये सोनाली कुलकर्णी दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत, प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शकही सांभळणार धुरा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  'झी युवा' वाहिनीवर येत्या डिसेंबर महिन्यापासून नवीन शो सुरु होत असून त्याचे नाव आहे 'युवा डान्सिंग क्वीन'. 11 डिसेंबरपासून सुरु होणा-या या डान्स रिअॅलिटी शोमध्ये अनेक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि सेलिब्रिटी चेहरे स्पर्धक म्हणून पाहायला मिळणार आहेत. हे स्पर्धक लोकसंगीत आणि मॉडर्न डान्सफॉर्म अशा दोन्ही प्रकारातील नृत्य स्पर्धक सादर करतील. युवा डान्सिंग क्वीन होण्यासाठीची ही स्पर्धा फारच अटीतटीची होणार आहे. या कार्यक्रमाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  

या स्पर्धेच्या निमित्ताने सगळ्यांची लाडकी अप्सरा, सोनाली कुलकर्णी  परीक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळेल. इंद्रपुरीतून उतरलेल्या या अप्सरेसमोर मंचावर या नृत्यांगना आपली नृत्यकला सादर करतील. सोनालीसह प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य या शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहे.

एक उत्तम दिग्दर्शक, अभिनेता असलेला अष्टपैलू कलाकार, अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे आणि आणखी एका परीक्षकाची ओळख अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे . सेलेब्रिटी नर्तिका आणि त्याबरोवर असे मोठे चेहरे, ही मेजवानी प्रेक्षकांसाठी बहारदार ठरणार, हे निश्चित.