Home | Business | Gadget | sonalika company tractors available in turkey

सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर आता तुर्कीच्या शेतात

Agency | Update - May 22, 2011, 01:30 PM IST

सोनालिका कंपनीने सर्बियामध्येही तिच्या ट्रॅक्टर्सची विक्री सुरु केली आहे.

  • sonalika company tractors available in turkey

    नवी दिल्ली - सोनालिका कंपनीने सर्बियामध्येही तिच्या ट्रॅक्टर्सची विक्री सुरु केली आहे. तुर्कस्थानच्या युरो-आशियाई देशातील व्यापाराच्या विस्तारामुळे युरोप आणि आफ्रिकेच्या बाजारातील पोहोच सुगम झाल्याचे, असे कंपनी व्यवस्थापनाने एका पत्रकात म्हटले आहे.

    कंपनीच्या सोलिस ट्रॅक्टर्सची तुर्कस्थानमधील विक्री अगोदरच पाय रोवलेल्या तेथील बड्या कंपन्यांच्या माध्यमातून केली जाईल असे कंपनीचे उपाध्यक्ष ए. एस. मित्तल यांनी सांगितले. तुर्कस्थानमध्ये सोलिससारख्या ट्रॅक्टर्सचा बाजार मोठा असून बाजारात विक्री होत असलेली ८५ टक्के ट्रॅक्टर्स ३५ ते ६ अश्वशक्तीची आहेत. अशात इंधन वापर, दर्जा आणि जबरदस्त ताकत असलेले सोलिस ट्रॅक्टर्स तुर्कस्थानच्या बाजारात चांगला व्यापार करू शकतील. प्रदुषणाच्या बाबतीतही कंपनीचे ट्रॅक्टर्स यूरो तीन मानके पूर्ण करतात. इंधनाची सतत होत असलेल्या दरवाढीच्या पाश्र्वभूमिवर इंधनाची बचत करणारे हे ट्रॅक्टर तुर्की शेतकऱ्यांना लाभदाई ठरणार आहे, असे म्हटले आहे.

Trending