आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : सोशल मीडियाच्या प्रभावातून बॉलिवूडही सुटले नाही. सध्या या माध्यमांवर सेलिब्रिटींना ट्रोल केले जात आहे. रविवारी काही असेच घडले. पण, सोनम कपूर आणि तापसी पन्नू ट्रोलर्सवर भारी पडल्या. दोन वेगळे मुद्दे असले तरी त्या आपल्या मुद्द्यावर ठाम राहिल्या. त्यांनी आपली भूमिका घेत बोलणाऱ्यांचे तोंड बंद केले.
शाहीन बाग फायरिंगवर सोनमने दु:ख व्यक्त करताच ट्रोलिंग सुरू झाले
दिल्लीच्या जामिया भागात एका अल्पवयीन मुलाने फायरिंग केल्यानंतर आता शाहीन बागेतदेखील एका तरुणाने फायरिंग केली आहे. या मुद्यांवर आपला राग व्यक्त करत सोनम कपूरने ट्वीट करून लोकांना द्वेष न पसरवण्याची विनंती केली आहे. तिने ट्विटरवर लिहिले, ‘भारतात असं काही घडेल, याची मी कल्पनाही केली नव्हती. असे धोकादायक फाळणी करणारे राजकारण बंद करा. यामुळे लोकांमध्ये द्वेष पसरत आहे. तुम्ही जर स्वत:ला हिंदु समजत असाल तर तुमचा धर्मच कर्म आहे आणि हे सर्व त्यात येत नाही.
सोनम कपूरच्या या ट्वीटनंतर अनेक लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. तिच्यावर प्रश्नचिह्न उपस्थित केले. मात्र तीने हार मानली नाही. तिने खंबीरपणे सर्वांची उत्तरे दिली...
‘कबीर सिंह’पूर्वी लिहिली होती ‘थप्पड’ची स्क्रिप्ट...
तापसी म्हणाली, ‘कबीर सिंह’ पाहून आम्ही ‘थप्पड’ चित्रपट बनवला, ही चुकीची गोष्ट आहे. ऐकून दुःख झाले. हा चित्रपट ‘कबीर सिंह’च्या रिलीजपूर्वी लिहिला गेला आहे. यात अनेक मुद्दे दाखवण्यात आले आहेत. कबीर सिंह आणि आमच्या चित्रपटात एक समानता आहे, ही गोष्ट मी मान्य करते. पण संपूर्ण विषय वेगळा आहे. यापूर्वीदेखील असे चित्रपट आले आहेत, ज्यात एक पुरुष स्त्रीला चापट मारतो. असे हजार चित्रपट आले आहेत. मात्र कबीर सिंह नवा चित्रपट असल्यामुळे लोक त्याच्याशी माझ्या चित्रपटाची तुलना करत आहेत.
मी केला नसता ‘कबीर सिंह’
तापसी पुढे म्हणाली, लोकांनी चित्रपट पाहताना आपला मेंदू घरी ठेऊन येऊ नये. ‘कबीर सिंह’ने खूप पैसा कमावला. निर्मात्यांना मी त्याच्यासाठी शुभेच्छाही देते. पण मला ‘कबीर सिंह’मध्ये मुलीची भूमिका करण्याची ऑफर आली असती तर मी कधीच केला नसता.
यूजर्सने ‘थप्पड़’ची तुलना ‘कबीर सिंह’शी केल्याने नाराज झाली तापसी
दुसरीकडे तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘थप्पड’ चे ट्रेलर जेव्हापासून रिलीज झाले तेव्हापासून अशी चर्चा सुरू आहे. चित्रपटाची कथा एका अशा मुलीची आहे, जी पतीने केलेल्या हिंसाचाराविरुद्ध आवाज उठवते आणि त्याला घटस्फोट मागते. चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हाने केले आहे. ट्रेलर येताच चित्रपटाच्या विषयावर चर्चा होऊ लागली. मात्र सोशल मीडियावर चित्रपटाची तुलना ‘कबीर सिंह’ सोबत केल्याने तापसी नाराज झाली आहे. त्यानंतर तिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.