आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव-याचा हात पकडून इव्हेंटमध्ये पोहचली सोनम कपूर, लग्नानंतर पहिल्यांदाच दिसली एवढ्या बोल्ड लूकमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री सोनम कपूर सध्या पती आनंद आहुजासोबत इटलीत आहे. येथे सुरु असलेल्या मिलान फॅशन वीकमध्ये ती पतीसोबत सहभागी झाली आहे. इटॅलियन डिझायनर Giorgio Armani च्या कलेक्शन लाँचवेळी हे दोघेही उपस्थित होते. इव्हेंटमध्ये नव-याच हात हातात घेऊन पोहोचली होती. यावेळी ती ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये अतिशय ग्लॅमरस दिसली. तिचा एकंदरीत लूक अतिशय गॉर्जिअस होता. पती आनंद आहुजाची तिच्यावरुन नजरच हटत नव्हते. 


लग्नानंतर पहिल्यांदाच नव-यासोबत एखाद्या इव्हेंटमध्ये पोहोचली सोनम... 
- सोनम कपूरने मिलान फॅशन वीकमध्ये डिझायनर अरमानीने डिझाइन केलेल्या ग्लॅमरस आउटफिटला पसंती दिली होती.

- लग्नानंतर पहिल्यांदाच सोनम नव-यासोबत एवढ्या बोल्ड लूकमध्ये दिसली.

- शो अटेंड केल्यानंतर सोनम आणि आनंद यांनी अरमानी यांची भाची आणि अभिनेत्री रॉबर्टा अरमानीसोबत जेवणाचा आनंद घेतला.  

- मिलान फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यापूर्वी सोनम आणि आनंद आहुजा इटलीत झालेल्या मुकेश अंबानींच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते.


पहिल्यांदाच वडिलांसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे सोनम 
सोनम कपूरच्या आगामी चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास, 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा तिचा आगामी चित्रपट असून यात ती तिचे वडील अनिल कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय 'जोया फॅक्टर' हा देखील तिचा एक आगामी चित्रपट आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, आनंद आहुजासुद्धा आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणार असून सध्या ते सासरे अनिल कपूर आणि मेव्हणी रिया कपूरकडून निर्मितीचे बारकावे शिकत आहेत.  

 

बातम्या आणखी आहेत...