Home | Gossip | sonam kapoor is celebrating wedding anniversary before 22 days

लग्नाचा पहिला वाढदिवस आत्तापासूनच साजरा करू लागली सोनम कपूर, 22 दिवस अगोदरच क्लबमध्ये केली पार्टी एन्जॉय, 'जिमी जिमी आजा आजा..' गाण्यावर जबरदस्त नाचली सोनम 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 17, 2019, 11:12 AM IST

पतीने सोबत केला नाही डान्स तर सोनमने दिले त्याला अल्टीमेटम... 

  • sonam kapoor is celebrating wedding anniversary before 22 days

    एंटरटेनमेंट डेस्क : सोनम कपूर आणि आनंद आहूजा यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस 8 मेला आहे. पण लग्नाच्या वाढदिवसाच्या 22 दिवस अगोदरच दोघांनी सेलेब्रेशन सुरु केले आहे. सध्या सोनम पतीसोबत दिल्लीमध्ये आहे. सोनमचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती मिथुन चक्रवर्ती यांच्या 1982 मध्ये आलेली सुपरहिट फिल्म 'डिस्को डांसर' मधील गाणे 'जिम्मी-जिम्मी आजा..' यावर डान्स करत आहे. तिचा हा व्हिडीओ दिल्लीमधील एका क्लबचा आहे. हा डान्स व्हिडीओ सोनमचा पती आनंद आहूजाने आपल्या इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. मात्र, आनंद डान्स करताना दिसत नाहीये. पटीने शेयर केलेल्या व्हिडिओवर सोनमने कमेंट करून त्याला अल्टीमेटम दिले आहे. सोनमने लिहिले, 'पुढच्यावेळी तुलाही आमच्यासोबत डान्स करावा लागेल.' यावेळी सोनमने मोनोक्रोम आउटफिट कॅरी केला होता. सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तिची अपकमिंग फिल्म 'जोया फॅक्टर' आहे. या फिल्ममध्ये ती साउथचा अभिनेता दलकीर सलमानसोबत दिसणार आहे.

Trending