आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती आनंद आहूजासोबत लिपकॉल करताना दिसली सोनम कपूर, इटलीमध्ये करत आहेत एन्जॉय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: सोनम कपूर आणि आनंद आहूजा नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. गेल्या काही दिवसांपुर्वी सोनम आणि आनंद मुकेश अंबानीची मुलगी ईशाच्या साखरपुड्यात सहभागी होण्यासाठी इटलीच्या लेक कोमो येथे गेले होते. या दरम्यान दोघंही खुप बोल्ड लूकमध्ये दिसले. सोनमने त्या दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती पती आनंदला लिपकॉल करताना दिसतेय. सोशल मीडियावर सोनम आनंदचा हा फोटो खुप व्हायरल होतोय. 


यापुर्वी सोनम आणि आनंद प्रियांका चोप्रा आणि तिचा होणारा पती निक जोनाससोबत पूल पार्टी करताना दिसले होते. पार्टी एन्जॉय करताना चौघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रियांका आणि सोनम खुप चिल मूडमध्ये दिसल्या होत्या. प्रियांकाने ब्लू टॉप आणि व्हाइट स्कर्ट घातला होता तर सोनम स्ट्रिप ड्रेसमध्ये दिसली होती. 


वडिलांसोबत पहिल्यांदा चित्रपटात दिसणार सोनम 
सोनमच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा आगामी चित्रपट 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा आहे. या चित्रपटात पहिल्यांदा वडील अनिल कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. यासोबतच ती 'जोया फॅक्टर'मध्येही दिसणार आहे. मुंबई मिरर रिपोर्टनुसार आनंद आहूजा आता फिल्म प्रोडक्शनमध्ये पाऊल ठेवणार आहे. प्रोडक्शनसाठी तो आपले सासरे अनिल कपूर आणि मेहूणी रियाकडून टिप्स घेत आहे. 
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...