• Home
  • Bollywood
  • Gossip
  • Sonam Kapoor said 'Friends wanted that i should date Anand's best friend' then i meet anand for the first time'

Bollywood / Love Story: आनंद अहुजा नव्हे, तर त्याच्या बेस्ट फ्रेंडला डेट करणार होती सोनम कपूर, कुणालाच वाटले नव्हते दोघांचे लग्न होईल...

आनंदच्या मित्राला डेट करण्यासाठी तिच्या मैत्रिणींनीच केले होते प्रोत्साहित, पण...

दिव्य मराठी

Jun 30,2019 06:00:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : सोनम कपूरने 8 मे 2018 ला दिल्ली बेस्ड बिजनेसमन आनंद आहूजासोबत लव्ह मॅरेज केले होते. लग्नाच्या सुमारे 14 महिन्यांनंतर एका इंटरव्यूमध्ये तिने सांगितले होते की, कशी तिची आणि आनंदची पहिली भेट झाली होती आणि कशी त्यांची प्रेमकहाणी लग्नपर्यंत पोहोचली. तिने सांगितल्याप्रमाणे, आनंद मध्यस्त होऊन आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत तिचे बोलणे करून देण्याचा प्रयत्न करत होता आणि ती त्याच्यासोबत एखाद्या शाळेच्या शिक्षिकेसारखी वागायची.

फ्रेंड्स आनंदच्या बेस्ट फ्रेंडसोबत करत होते सेटिंग...
सोनम म्हणते, "मांजर फ्रेंड्स मला आनंदच्या बेस्ट फ्रेंडसोबत सेट करू इच्छित होते. याचदरम्यान माझी आणि त्याची (आनंद) भेट झाली. पहिल्यांदा मी आनंदला तेव्हा भेटले जेव्हा, 'प्रेम रतन धन पायो' च्या (2015) प्रमोशनमध्ये व्यस्त होते. एक दिवस माझे फ्रेंड्स मला ताज हॉटेलच्या बारमध्ये घेऊन गेले. मी तिथे इरिटेट होत होते. कारण जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा मोल कळाले की, माझ्या फ्रेंड्सने या दोन-तीन मुलांनाही बोलावले होते, ज्यांना भेटण्यात मला काहीही रस नव्हता."

सोनम म्हणाली होती, 'माझा लग्नावर विश्वास नाही...'
सोनमने पुढे सांगितले, "माझे म्हणणे होते की, मला कुणाला डेट करायचे नव्हते. मी लग्न आणि त्यासारख्या गोष्टींमध्ये विश्वास ठेवत नाही. मी आनंद आणि त्याच्या बेस्ट फ्रेंडला पहिले. त्याचा मित्र माझ्यासारखाच उंच होता. माझ्यासारखीच त्याला पुस्तके वाचायला आवडायची आणि हिंदी चित्रपट आवडायचे. तो एक शिक्षित आणि चांगला माणूस होता. पण त्याला पाहून मला माझा भाऊ हर्षची आठवण यायची. मी म्हणाले - 'मित्रांनो तो हर्ष आहे. मी त्या व्यक्तीला डेट करू शकत नाही."

'कुणालाच वाटले नव्हते - मी आणि आनंद एकत्र येऊ'
सोनम पुढे म्हणाली, "कधी कधी लोकांना वाटते की, जर त्यांचे विचार जुळत असतील तर ते एकत्र येऊ शकतात. कुणालाच नव्हते वाटले की, मी आणि आनंद एकत्र येऊ. कारण आम्ही एकमेकांपेक्षा खूप वेगवेगळे आहोत. त्याला हे माहित नव्हते की, माझे वडिल अनिल कपूर आहेत. मी पूर्ण संध्याकाळ आनंदसोबत बोलत होते. आनंद मध्यस्थी होऊन त्याच्या मित्राशी माझे बोलणे करून देण्याचा प्रयत्न करत होता. पण आमच्यामध्ये बोलणे जास्त झाले."

जेव्हा आनंदने रात्री 2.30 वाजता पाठवला होता मॅसेज...
सोनमने सांगितल्याप्रमाणे आनंदने जेव्हा तिला पहिल्यांदा मॅसेज केला तेव्हा रात्रीचे 2.30 वाजले होते. ती म्हणाली, "एक दिवस मला आनंदची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट आली, त्यासोबत मॅसेज होता, 'तू अजूनही सिंगल आहेस ? कारण दुसरेही कुणीतरी सिंगल आहे. जर तू लंडनमध्ये असशील तर प्लीज त्याला बोलून घे.' हा मॅसेज रात्री 2.30 वाजता आला होता. मी त्याला रिप्लाय केला, 'तू मला रात्री उशिरा मॅसेज पाठवला नाही पाहिजे.'

शाळेतील शिक्षिकेसारखी वागायची सोनम...
सोनम म्हणाली, "मी एका शाळेतील शिक्षिकेसारखी वागायचे. लिहिले, 'मला रात्री उशिरा मॅसेज करू नको आणि जर तुझ्या मित्राला बोलायचे आहे तर त्याने स्वतः मॅसेज करावा. तू का करत आहेस ?' याप्रकारे आमचे बोलणे सुरु झाले. मग फोनवर आम्ही बोलायला सुरुवात केली. दोन आठवड्यानंतर मी त्याला विचारले की, तुला अजूनही तुझ्या मित्राशी माझे बोलणे करून द्यायचे आहे ? तर तो म्हणाल, 'नाही-नाही, कधीच नाही. मी तुला स्वतःसाठी वाचवतो."

X