आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई : सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहूजाचा एक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते जमिनीवर झोपलेले दिसत आहेत. स्वतः सोनमने हा सेल्फी आपल्या इंस्टा स्टोरीवर शेयर केला आहे. हा फोटो सोनमने तेव्हा क्लिक केला होता, जेव्हा तिने आणि आनंदने लंडनच्या घरात पहिली रात्र घालवली. सोनमने आपल्या या सेल्फीवर लिहिले, "लंडनमध्ये जमिनीवर झोपतांना, कारण आमचे बेड्स अजून आलेले नाहीत. पण आनंद बरोबर आहे, कारण या सुंदर आठवणी आहेत".
आता जास्तकाळ लंडनमध्येच राहते सोनम...
- सोनम कपूरने 8 मे 2018 ला दिल्ली बेस्ड बिजनेसमॅन आनंद आहूजासोबत लग्न केले. यानंतर ती जास्तीत जास्त वेळ लंडनमध्येच असते. रिपोर्ट्सनुसार, आनंदने तिथे घर खरेदी केले आहे. लग्नानंतर सोनम आणि आनंदने पहिली दिवाळी लंडनमध्येच सेलिब्रेट केली होती. आनंद आहूजा Bhane ब्रांडचा फाउंडर आहे. देशात मल्टी ब्रांड स्नीकर बुटीक आणण्याचे क्रेडिटही आनंदलाच जाते.
View this post on InstagramA post shared by Instant Bollywood (@instantbollywood) on Jan 4, 2019 at 5:35pm PST
Long Distance Relationship मेंटेन करतात सोनम-आनंद
सोनम आणि आनंद लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपही सहज मेंटेन करतात. खास गोष्ट ही आहे की, कामानिमित्त जेव्हा केव्हा ते एकमेकांपासून दूर राहतात तेव्हाही ते रोज सोबतच जेवण करतात. स्वतः आनंदने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते, "आम्ही भेटू नाही शकलो किंवा एकाचवेळी सोबत नसलो म्हणून काय झाले तरीही आम्ही सोबतच जेवण करतो ...स्काइपवर. आम्ही दोघांनी हे ठरवले आहे की, काहीही झाले, कितीही काम असले तरी दोन आठवड्यांपेक्षा जास्त एकमेकांपासून दूर राहायचे नाही''.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.