आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरा बेदीवर आधारित आहे चित्रपट ‘जोया फॅक्टर’मधील साेनमची भूमिका 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सोनम कपूरचा आगामी जोया फॅक्टर चित्रपट याच नावाने लिहिलेल्या कादंबरीवर आधारित आहे. लेखिका अनुजा चौहान यांची ती कादंबरी आहे. मात्र, निर्मात्यांनी चित्रपटात काही बदल केले आहेत. कादंबरीत जाेयाचे मूळ पात्र जाहिरात प्रतिनिधीचे होते, नंतर ती भारतीय क्रिकेट टीमची लकी चार्म बनते. चित्रपटातदेखील बेसिक प्लॉट हाच अाहे, आता एक नवीन गोष्ट जोडल्याचे कळतेे आहे. संपादन टीमच्या लोकांच्या मते, चित्रपटात सोनमची भूमिका मंदिरा बेदीवर आधारित आहे. याविषयी कोणीच अधिकृत माहिती दिली नाही, मात्र यात महिलेचे असे पात्र आहे, असे बाेलले जात आहे.
 

संजयला संधी
चित्रपटात आणखी एक बदल झाला आहे. जोयाच्या वडिलांच्या भूमिकेत निर्मात्यांनी आधी अनिल कपूरला घेतले होते, नंतर त्याच्या जागी सोनमचा काका संजय कपूरला घेतले आहे. सोनम पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटात काका संजयसोबत काम करणार आहे.
 

टीमचे म्हणणे 
जोयाचे पात्र आणखी मजेदार बनवण्यासाठी निर्मात्यांनी त्यात बदल केला आहे. २००३ मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये मंदिरा बेदीच्या रूपात भारताला महिला समालोचक मिळाली होती. त्या वेळी तिची भविष्यवाणी खरी ठरत होती. तिच्या उपस्थितीलादेखील जाणकारांनी लेडी लक मानले होते. 
 

डुलकरसोबत असेल पहिला चित्रपट 
यात सोनमसोबत दाक्षिणात्य अभिनेता डुलकर सलमान आहे. त्याच्यासोबतही सोनम पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. यापूर्वी सोनमसोबत बरेच नवे हीरो घेण्यात आले. कारण ‘खूबसूरत’मध्ये तिच्यासोबत फवाद खान होता, ‘नीरजा’मध्ये शेखर रवजियानी तिच्यासोबत दिसला होता. खरं तर, डुलकर या चित्रपटाआधी इरफान खानच्या कारवामधून बॉलीवूडमध्ये आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...