हवामान / हवामान बदलाविरुद्ध सोनम वांगचुक विनाचलन जगातील सर्वात मोठी निधी योजना सुरू करणार, फक्त सवयींचाच खर्च

असे घडवतील परिवर्तन : लिफ्ट सोडा, पायी चाला, ऑफिसला सायकलवर जा

दिव्य मराठी नेटवर्क

Sep 21,2019 11:16:00 AM IST

मुकेश कौशिक | नवी दिल्ली
‘थ्री इडिएट‌्स’मधील एक व्यक्तिरेखा सोनम फुंगचुक वांगडू ज्यांच्या प्रेरणेतून साकारली गेली ते सोनम वांगचुक हवामान बदलाविरुद्ध लढण्यासाठी एक आगळेवेगळे अभियान सुरू करत आहेत. पायी चालणे, सायकलचा वापर अशा छोट्या सवयींना ते चलनात मोजतील. या क्राऊड फंडिंग मॉडेलबद्दल त्यांनी सांगितले, लोकांकडून १०० डॉलर मदत मागण्याऐवजी ज्यातून १०० डॉलर ऊर्जेची बचत होऊ शकेल अशा सवयी सोडण्याचा आग्रह करतील. यातून होणाऱ्या बचतीचा हिशेब मांडून सवयी दान करणाऱ्यांच्या खात्यात रक्कम दाखवली जाईल. यामुळे अब्जावधी डॉलर ऊर्जेची बचत होईल.


असे घडवतील परिवर्तन : लिफ्ट सोडा, पायी चाला, ऑफिसला सायकलवर जा
लिफ्ट वापरू नका : ही अगदी छोटी सवय सोडली तर रोज लाखो डॉलरच्या विजेची बचत होईल. कारण वीज तयार करताना प्रचंड कार्बन उत्सर्जन होत असते.


पायी चाला : एखाद्या कामाला वाहनाऐवजी पायी जाणे शक्य असेल तर ५ किमी पायी चालण्याच्या सवयीचे बटण क्लिक करण्यास लोकांना सांगितले जाईल.


सायकलवर प्रवास : ऑफिस ५ किमी अंतरात असेल तर सायकलवरच जाण्याची शपथ घेतली जाईल. यातून शारीरिक ऊर्जा मिळेल आणि आरोग्यही लाभेल.


विमान नव्हे, रेल्वे : लोकांना रेल्वेचे बटण क्लिक करा, असे सांगितले जाईल. कारण, विमानाने रेल्वेच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन कित्येकशे पट अधिक होते.


लडाखमध्ये विद्यापीठ, गुंतवणूक ८०० कोटी
वांगचुक सध्या लडाखमध्ये विद्यापीठ स्थापनेच्या कामात आहेत. यासाठी ८०० कोटी खर्च येईल. ते म्हणाले, सध्या लोकांची मदत घेतली जात आहे. योजना यशस्वी झाली तर सरकार स्वत:हून मदत करेल.

X
COMMENT