आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय महिला बॉक्सर विजयी होताच बल्गेरियाच्या महिला प्रशिक्षिकेने रिंगमध्ये फेकली बॉटल, असा होता वर्ल्ड चॅम्पियनशिपचा थरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय महिला बॉक्सर सोनिया चहलने बल्गेरियाची गत विश्वविजेती स्टेनिमिराला पराभूत केले. सोनियाने स्टेनिमिराला 29-28, 29-28, 28-29, 29-28, 28-29 अशी 3-2 ने धूळ चारत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. तेथे सोनियाचा कोलंबियाच्या मार्सेला कास्टेनाडासोबत सामना होणार आहे. 

स्टेनिमिरा आणि तिचे प्रशिक्षक पीटर योसिफोव यांनी पराभूत झाल्यानंतर अंपायरिंगवर प्रश्चनिन्ह उपस्थित केले. स्टेनिमिराने पंचांवर चुकीचा निर्णय देण्याचा आरोप करत पंच भ्रष्ट असल्याचे म्हटले. तिने सांगितले की, सामना मी जिंकला होता. पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा असून मला तो मान्य नाही. दरम्यान पीटरने निर्णयाच्या विरोधात रिंगमध्ये बॉटल फेकली होती. या गैरवर्तनामुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सर असोसिएशनने पीटरची मान्यता रद्द केली आहे.

 

सोनिया म्हणाली - पंचांचा निर्णय योग्य आहे.
> आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन या प्रकरणाची चौकशी करणार आहे. विजयी झाल्यानंतर सोनियाने सांगितले की. पंच विजेता ठरवतात आणि त्यांचा निर्णय योग्य असतो. त्यामुळे पंचांना घेतलेला निर्णय योग्यच होता. कारण पंच काय निर्णय घेतील याचा अंदाज बॉक्सरला रिंगमध्ये नाही येत. त्यामुळे विजेता घोषित करणे पंचांचे काम आहे आमचे नाही. 

 

> दुसऱ्या एका सामन्यात भारताच्या स्वीटीला वादग्रस्त निर्णयामुळे पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या फेरीत स्वीटीला पोलंडच्या एल्जबिटा वोजकिकने पराभूत केले. यापूर्वी रविवारी भारताच्या एल. सरिता देवीचा विवादास्पद निर्णयामुळे पहिल्या फेरीत पराभव झाला होता. परंतू पंचांच्या निर्णयाला आव्हान देणार नसल्याचे तिने सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...