आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनियांचा काँग्रेस नेत्यांना 'वेट अँड वाॅच'चा सल्ला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ मुंबई : महायुतीला स्पष्ट बहुमत असूनही शिवसेना-भाजप नेत्यांच्या ताठर भूमिकेमुळे महाराष्ट्रात अद्याप नवे सरकार सत्तारूढ हाेऊ शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत पक्षाध्यक्षा साेनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पााठिंब्यावर शिवसेना सरकार बनवण्याच्या तयारीत असून त्याबाबत अापण काय निर्णय घ्यावा, याबाबत त्यांच्याकडे विचारणाही केली. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी मंगळवारी चर्चेनंतरच अंतिम निर्णय होईल. ताेपर्यंत 'वेट अँड वाॅच'ची भूमिका घ्यावी, असा सल्ला साेनियांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्याची माहिती अाहे.


काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात, माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे अादींचे शिष्टमंडळ शुक्रवारी दिल्लीत हाेते. त्यांनी पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगाेपाल यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली. तर सायंकाळी साेनियांशी चर्चा केली. 'भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र सत्ता स्थापन करावी,' असा एक पर्याय असल्याचे या नेत्यांनी सांगितले. मात्र, साेनियांनी काेणताही निर्णय घेतला नाही.

रयतेच्या राज्यासाठी शिवसेनेला मदत करू : मलिक
सोनिया गांधी शिवसेनेला मदत करण्यास तयार झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र १० मिनिटांत तयार हाेऊ शकते. मात्र, त्यासाठी ५ तारखेची वाट पाहावी लागेल, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले. रयतेचे राज्य स्थापन होत असेल तर राष्ट्रवादीही शिवसेनेसाेबत जाण्यास तयार असल्याचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.

मंगळवारी पवार-साेनियांची चर्चा
शरद पवार ५ नाेव्हेंबरला दिल्लीत साेनिया गांधींशी चर्चा करून अाघाडीची भूमिका ठरवणार अाहेत. गुरुवारी काँग्रेस नेत्यांनी मुंबईत पवारांची भेट घेऊन भाजपशिवाय सत्तास्थापनेच्या पर्यायाची चाचपणी केली हाेती. मात्र, त्यांनी 'तुम्ही तुमच्या हायकमांडशी चर्चा करून अाधी निर्णय घ्या, मग पुढचे बघू,' असे पवारांनी सांगितले हाेते. दरम्यान, काँग्रेसमध्ये याबाबत कोणतेही मतभेद नाहीत, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...