आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनिया गांधींनी केले गडकरींच्या कामाचे कौतुक, मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा बाक वाजवून दिले समर्थन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - यूपीए अध्यक्ष सोनिया गांधींनी गुरुवारी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कामांचे कौतुक केले. गडकरींच्या मंत्रालयाने देशभरातील पायाभूत विकासात केलेल्या कामगिरीला सोनिया गांधींनी अधोरेखित केले आहे. लोकसभेत प्रश्नकाल सुरू असताना गडकरींच्या मंत्रालयाशी संबंधित दोन प्रश्न विचारण्यात आले. यावर बोलताना गडकरींनी देशात किती रस्ते आणि महामार्गांची कामे झाली आणि किती कामे बाकी आहेत याची माहिती दिली.


लोकसभेत प्रश्नोत्तरांचा काळ सुरू असतानाच सोनिया गांधींकडून गडकरींविषयी गौरवोद्गार निघाले आहेत. पायाभूत विकासाच्या प्रश्नांना उत्तर देताना गडकरी म्हणाले, की "समस्त देशात खासदार कुठल्याही पक्षाचे असो माझ्या मंत्रालयाने केलेल्या कामांचे ते कौतुक करतात.'' गडकरींच्या या वक्तव्यानंतर सर्वच भाजप खासदारांनी बाक वाजवून त्यांना समर्थन दिले. याचवेळी भाजप खासदार गणेश सिंह यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे गडकरींनी केलेल्या कामांचे सभागृहात जाहीर कौतुक व्हायला हवे असा प्रस्ताव दिला. याच दरम्यान, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधींनी सुद्धा एका स्मितहास्यासह डेस्क वाजवून या गोष्टीचे समर्थन केले. हे पाहून लोकसभेत विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खरगेंसह सर्वांनीच गडकरींचे कौतुक केले.


सोनिया गांधींनी गडकरींच्या कामगिरीचे कौतुक करण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी यापूर्वी ऑगस्टमध्ये गडकरींना पत्र लिहून रायबरेली लोकसभा मतदारसंघात रस्त्याची समस्या दूर केल्याबद्दल धन्यवाद म्हटले होते. तर नुकतेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा गडकरींच्या कामाची प्रशंसा केली होती. केवळ गडकरींमध्येच राफेल डील आणि शेतकऱ्यांसह विविध गोष्टींवर सत्य बोलण्याचे धाडस आहे.

बातम्या आणखी आहेत...