आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री नव्हे सरकारच बदला - सोनिया गांधीचे उत्तरांखडवाशींयाना आवाहन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - उत्तराखंडमधील भाजप सरकारने नैसर्गिक स्त्रोतांची लूट चालविली असून, विकासाच्या नावाखाली येथील लोकांची मोठी फसवणूक करीत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी केवळ मुख्यमंत्री बदलून चालणार नाही तर एकदा सरकारच बदला असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तराखंडच्या नागरिकांना केली. राज्यात येत्या ३० जानेवारीला विधानसभेच्या ७० जागांसाठी निडवणुक होत आहे. त्यानिमित्ताने सोनियांनी हरिद्वार जिल्ह्यातील रुरकी येथे पहिलीच प्रचारसभा घेतली.
कुंभ गैरव्यवहारामुळे मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल यांना चार महिन्यापूर्वी राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्याजागी निवृत्त मेजर जनरल बी. सी. खंडूरी यांना भाजपने पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणल्याचा संदर्भ देत सोनिया म्हणाल्या, जेव्हा भाजपचे नेतृत्व उघडे पडले तेव्हा भाजपने मुख्यमंत्री बदलल्याचे नाटक केले. मात्र झालेली फसवणूक ही पक्षाकडून झालेली आहे. एक व्यक्ती बदलून काहीही होत नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी भाजप सरकारच बदलावे. खंडूरी आले असले तरी वास्तवात काहीच बदललेले नाही.
विकासाच्या नावाखाली नैसर्गिक स्त्रोतांचा नाश करणारा भाजप विकासकामांसाठी केंद्र सरकारने दिलेला पैसा मात्र पूर्ण वापरत नाही, असा आरोप करून सोनिया म्हणाल्या, की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठीची केवळ 10 टक्के रक्कम सामान्यांपर्यंत पोचली आहे. शिवाय राज्याला केंद्राकडून मिळालेल्या एकूण निधीपैकी केवळ 40 टक्केच निधी वापरण्यात आला. त्यामुळे येथील नागरिकांना मी आवाहन करते की, तुम्ही येथील सरकार बदलावे.
अशी आहे उत्तराखंड विधानसभेचे चित्र