Home | National | Other State | Sonia gandhi files nomination papers for Raibareli lok sabha seat with family

रायबरेलीत सोनिया गांधींचा रोड शो, आईचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल प्रियंका यांचीही उपस्थिती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 11, 2019, 02:30 PM IST

काँग्रेसचा येथून तीन वेळा झाला होता पराभव, यंदा माजी काँग्रेस नेत्याकडूनच आव्हान

  • Sonia gandhi files nomination papers for Raibareli lok sabha seat with family

    रायबरेली - यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी रायबरेलीत सहकुटुंब पोहोचल्या. त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि मुलगी प्रियंका गांधी सुद्धा उपस्थित आहेत. सोनिया गांधी पाचव्यांदा या जागेवरून लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करत आहेत. 2004 पासून त्या याच जागेचे प्रतिनिधित्व करत आहेत. यावेळी सोनिया गांधींना माजी काँग्रेस नेते दिनेश प्रताप सिंह यांच्याकडून आव्हान मिळत आहे. त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. 1967 पासूनच गांधी कुटुंबीय पूजा करून उमेदवारी अर्ज दाखल करतात. सोनिया गांधींनी तीच परमपरा कायम ठेवली आहे.


    याच जागेवरून काँग्रेसचा तीनदा पराभव
    रायबरेली लोकसभा मतदार संघावर नेहमीच काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे असे नाही. काँग्रेसला या जागेवरून 1977, 1996 आणि 1998 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आणीबाणीनंतर 1977 मध्ये भारतीय लोक दलाचे नेते राज नारायण यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना येथून पराभूत केले होते. यानंतर 1996 आणि 1998 मध्ये भाजपचे उमेदवार अशोक कुमार सिंह यांनी ही जागा जिंकली होती. याच मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्यांमध्ये इंदिरा गांधी, अरुण नेहरू, शीला कौल आणि सतीश शर्मा यांचा समावेश आहे.

Trending