आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींचे नाव न घेता सोनिया गांधींनी डागली तोफ; म्हणाल्या, हा तर जादुगार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलार (कर्नाटक)- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता तोफ डागताना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, की मुळ चेहरा लपवून केवळ मास्क असलेला चेहरा जनतेला दाखविला जातोय. देशातील सर्व वाईट गोष्टींवर तोडगा काढू शकतो अशा जादुगाराच्या रुपात या नेत्याला सादर केले जात आहे.
इतर राज्यांमध्ये विकास झालेलाच नाही. केवळ गुजरात राज्याने विकास साधला आहे, असा प्रचार सध्या केला जात आहे. लहान-सहान बाबी मोठ्या करुन दाखविण्याची एक नवीन स्टाईल राजकारणात आली आहे, असे सांगत सोनिया गांधी यांनी विकासाच्या गुजरात मॉडेलवर हल्ला चढविला.
सोनिया गांधी म्हणाल्या, की सध्या देशभरात ठिकठिकाणी मोठमोठे पोस्टर लागले आहेत. त्यावर निवडणुकीच्या जाहिराती लावल्या जात आहेत. सत्य लपवून खोटं लोकांच्या मनात भरण्याचा प्रयत्न सुरू आहे. गुजरातमधील महिलांची अवस्था दयनिय आहे. महिलांवर वेगवेगळ्या स्वरुपातील अत्याचार केले जात आहेत. गरीब घरांमधील मुले कुपोषणाने जीव गमावित आहेत. आदिवासींना जगणे कठिण होऊन बसले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने बळकाविल्या जात आहेत. असे असतानाही त्यांचा एकतेवर विश्वास नाही. भावाभावांमध्ये भांडण लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.