आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonia Gandhi Reax: Congress Interim President Sonia Gandhi Reaction On BJP Over Jharkhand Vidhan Sabha Chunav Election Result 2019

भाजप धर्म आणि जातीवरून लोकांमध्ये फूट पाडण्यात अपयशी ठरले, झारखंड निकालांवर सोनिया गांधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष लोकांमध्ये जात आणि धर्माच्या नावाने फूट पाडण्यात अपयशी ठरले आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी ही प्रतिक्रिया दिली. सद्यस्थितीला झारखंडचे निकाल खूप महत्वाचे ठरले आहेत. भाजपच्या फूट पाडणाऱ्या एजंड्याला हाणून पाडल्याबद्दल झारखंडच्या जनतेचे आभार असे त्या म्हणाल्या आहेत.  झारखंड विधानसभा विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव चाखावा लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि झामुमो आघाडीने 51 पैकी 47 जागा जिंकल्या. तर भाजपला केवळ 25 जागांवर समाधान मानावे लागले. नोटाबंदी, एनआरसी, सीएए आणि स्थानिक प्रश्नांवर दुर्लक्ष या कारणांमुळेच भाजपने गेल्या 12 महिन्यात 5 राज्यांतील सत्ता गमावली आहे.

तत्पूर्वी झारखंडच्या निकालांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपचा समाचार घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यात आणि प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये खूप फरक असल्याचे सिद्ध झाले असे ते म्हणाले होते. सोबतच त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. यानंतर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही भाजपला चिमटा घेतला. चिदंबरम यांनी ट्विट केले, की 2019 मध्ये भाजपची कहाणी अशीच राहणार आहे. हरियाणामध्ये कमकुवत झाले, महाराष्ट्रात नकारण्यात आले आणि झारखंडमध्ये तर थेट पराभव झाला. भारताची राज्यघटना वाचवण्यासाठी सर्वच बिगर भाजप पक्षांना काँग्रेससोबत येऊन मोर्चा काढायला हवा असेही चिदंबरम म्हणाले आहेत.