आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Gandhi To Be Released Today Congress Manifesto

जाहीरनामा : काँग्रेसच्या पेन्शनच्या घोषणेमागील जाणून घ्या निवडणूक गणित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आरोग्य सेवा आणि रोजगाराला कायदेशीर अधिकारांच्या कक्षेत आणणे आणि सर्वांना घर व पेन्शन या मुख्य घोषणा काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज (बुधवार) लोकसभा निवडणूक 2014 साठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात खासगी क्षेत्रामध्ये अनुसूचीत जाती आणि जमातींना आरक्षणाचीही घोषणा केली गेली आहे.
पेन्शन योजनेमागील काँग्रेसची रणनीती?
सर्वांना निवृत्तीवेतन हे काँग्रेसने दिलेले आश्वासन सर्वसामान्यांबद्दल त्यांना असलेल्या आस्थेचे प्रतिक नसुन या मागे मोठा राजकीय फायदा घेण्याचे त्यांचे गणित आहे. युवकांना आकर्षित करण्यात काँग्रेस अपयशी ठरत असल्याचे अनेक सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे काँग्रेसने मध्यमवयीन आणि वृद्धांकडे मोर्चा वळविला आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत असे 70 टक्क्यांहून अधिक मतदार आहेत. युवा मतदारांची संख्या केवळ 15 ट्कके आहे. त्यामुळे या दुस-या वर्गावर काँग्रेसने लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्यामुळेच काँग्रेस पेन्शन योजनेचा जोरदार प्रचार करीत आहे.
युवकांकडेही दूर्लक्ष नाही
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मध्यमवयीन आणि वृद्धांकडे विशेष लक्ष्य दिल्याचे दिसत आहे. त्यासोबतच युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन देण्याची त्यांची घोषणा त्याबरोबरच खासगी क्षेत्रातील नोक-यांमध्ये आरक्षणाचे आश्वासन देऊन युवकांमधील एका मोठ्या वर्गाला आकर्षित कण्याची काँग्रेसची योजन आहे.
पुढील स्लाइडमध्ये, जाहीरनाम्याबद्दल पंतप्रधान आणि राहुल गांधी काय म्हणाले