Home | International | Other Country | Sonia Mahmood has shared her horrifying story

13 वर्षीय मुलीसोबत बलात्‍कार करत राहिला सावत्र बाप, 2 वर्षांनंतर आईने रंगेहाथ पकडल्‍यावर समोर आले प्रकरण

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Aug 24, 2018, 04:18 PM IST

युवतीने शेअर केली आपल्‍यावर झालेल्‍या अत्‍याचाराची कहाणी...

 • Sonia Mahmood has shared her horrifying story

  हेकमोंडवाइक - मुळ पाकिस्‍तानची असलेली आणि सध्या बिटनमध्‍ये वास्‍तव्‍यास असलेल्‍या एका तरूणीने लहानपणी स्‍वत:वर झालेल्‍या अत्‍याचाराची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. तरूणी 13 वर्षांची असताना सावत्र पित्‍याने तिच्‍यावर बलात्‍कार केला. नंतर सलग दोन वर्षे तो अत्‍याचार करत राहिला. एकेदिवशी अचानक तरूणीची आई मुलीच्‍या खोलीत शिरली असता तिला हा धक्‍कादायक प्रकार दिसला. नंतर याप्रकरणी कोर्टाने आरोपीला 15 वर्षांची शिक्षा सुनावली. तरूणी सध्‍या 24 वर्षांची असून ती आपल्‍या आईसोबत हेकडमोंडवाइक येथे राहते.


  - सोनिया महमूद असे तरूणीचे नाव आहे. सोनियाने सांगितल्‍यानूसार, ती लहान असतानाच तिचे आईवडील वेगळे झाले. नंतर 1999 साली ती 5 वर्षांची असताना तिची आई मरियमने एजाज अख्‍तर याच्‍याशी विवाह केला. तो मूळचा पाकिस्‍तानचा आहे.

  2007मध्‍ये आले ट्विट
  - सोनियाने सांगितले आहे की, लग्‍नानंतर सुरूवातीला सर्व काही सुरळीत होते. मीही त्‍यांना वडील म्‍हणून मानू लागले होते. तर तेही मला मुलीप्रमाणे प्रेम करत असे.
  - जेव्‍हा एजाज व आईला 2002 मध्‍ये एक मुलगी व 2004मध्‍ये एक मुलगा झाला तरीही एजाज अख्‍तर यांच्‍या स्‍वभावात काहीही फरक पडला नव्‍हता. ते आम्‍हा तिघा भावडांना सारखेच प्रेम करत असत.
  - 2007 पर्यंत सर्व काही ठिक चालले होते. तेव्‍हा मी 13 वर्षांची होती. यादरम्‍यान माझ्या आज्‍जीचे पाकिस्‍तानमध्‍ये निधन झाल्‍यामुळे आई आम्‍हा तिघा भावडांना घेऊन पाकिस्‍तानमध्‍ये गेली. यावेळी आमच्‍यासोबत एजाज आले नाही. ते ब्रिटनमध्‍ये राहिले.
  - सोनियाने सांगितले की, आज्‍जीच्‍या निधनानंतर आम्‍हाला तेथे 3 आठवडे राहायचे होते. मात्र मध्‍येच माझी शाळा सुरू झाली. शाळा बुडू नये म्‍हणून आईने मला एकटीला परत ब्रिटनमध्ये पाठवले. मी घरी आले तेव्‍हा मला एजाज फार खूश झाले. आणि मला पाहताच त्‍यांनी आनंदाने घट्ट मिठी मारली.


  नंतर अचानक बदलू लागली पित्‍याची वागणूक
  - घरी आल्‍यावर एजाज यांची माझ्याप्रतीची वागणूक अचानक बदलू लागली. त्‍यानंतर ते रोज माझ्यासाठी असे काही करू लागले जे त्‍यांनी यापूर्वी कधीही केलेले नव्‍हते. हे सर्व फार विचित्र होते.
  - ते माझ्याकडे एकटक पाहू लागले. तेव्‍हा त्‍यांच्‍या डोक्‍यात काय चालू आहे, याची मला काही कल्‍पना आली नाही. नंतर एकेदिवशी अचानक ते मला म्‍हणाले की, माझी मालिश कर. त्‍यांचे हे वाक्‍य ऐकूण मला धक्‍काच बसला. नंतर ते म्‍हणाले, माझे खांदे फार दुखत आहेत. त्‍यांची मालिश करून दे. घरी कोणीच नसल्‍याने मला काय उत्‍तर द्यावे सूचले नाही व मी त्‍यांचे खांदे दाबून देऊ लागली.
  - दुस-या दिवशी शाळेतून येताच ते माझ्या छातीकडे पाहू लागले. मी फार संकोचले. नंतर ते म्‍हणाले, तुझे वय पाहता तुझे स्‍तन मोठे आहेत. असे म्‍हणत त्‍यांनी मला ओढले व नंतर घट्टपणे स्‍वत:च्‍या मिठीत दाबून धरले. काय करावे, मला काहीच समजले नाही. फक्‍त हे लवकरात लवकर संपावे, असेच वाटले. मात्र नंतर सुरू होणा-या वाईट दिवसांची ही तर केवळ एक सुरूवात होती.
  - त्‍याच रात्री त्‍यांनी सर्वप्रथम माझ्यावर बलात्‍कार केला. मी त्‍यांच्‍या जाड शरीराच्‍या खाली होती. मला हालताही येत नव्‍हते. मी आई, भाऊ, बहिणीच्‍या नावाने ओरडले. मात्र तेव्‍हा कोणीही घरात नव्‍हते. मला वाटले यानंतर असे होणार नाही. मात्र त्‍याच्‍या तोंडाला तर रक्‍त लागले होते. त्‍यानंतर दिवसातून अनेकदा तो मला त्‍याच्‍या वासनेची शिकार बनवायचा.

  आई आल्‍यानंतरही थांबले नाहित अत्‍याचार
  - आई आल्‍यानंतरही वडीलांचे अत्‍याचार थांबले नाहीत. संधी मिळेल तसा तो माझ्यावर अत्‍याचार करायचा. आई किचनमध्‍ये किंवा बाथरूममध्‍ये असली तर तो मला ओढत बेडरूममध्‍ये घेऊन जायचा व तोंड दाबून माझ्यावर अत्‍याचार करायचा. एवढेच नव्‍हे तर दररात्री तो माझ्यावर अत्‍याचार करायचा. तरीही आईला याबद्दल काही कळाले नव्‍हते.
  - नंतर तर त्‍याने मला धमकावले की, याची कुठे वाच्‍यता केली तर तुझी आई कधीही तुझ्याशी बोलणार नाही. तसेच मला मोबाईलचे आमिषही दाखवले.  आईने पकडले रंगेहाथ
  - पित्‍याचे अत्‍याचार सुरू होऊन आता 2 वर्षे झाली होती. माझी सहनशक्‍ती आता संपत चालली होती. मी नेहमी घाबरलेली असायचे. शेवटी 2009मध्‍ये असा दिवस आला जेव्‍हा माझ्या या त्रासाचा शेवट झाला.
  - एकेदिवशी एजाजने मला पाणी घेऊन त्‍याच्‍या खोलीत बोलावले. आई तेव्‍हा किचनमध्‍ये होती. मी पाणी घेऊन जाताच त्‍याने मला बेडवर पाडले व रेप करू लागला. मी नेहमीप्रमाणे डोळे बंद करून सहन करू लागले. तोच तो मध्‍ये थांबला. असे यापूर्वी कधीही झाले नव्‍हते.
  - मी डोळे उघडले व समोर पाहिले तर मला आई समोर उभी असलेली दिसली. नंतर आई तेथून निघून गेली. एजाजही तिच्‍या पाठोपाठ गेला. मी तशीच बेडवर पडून होते. मात्र या घटनेमुळे मी शॉक्‍ड होते.
  - मला वाटले यासाठी आई मलाच जबाबदार धरेल म्‍हणून मी आपली बॅग पॅक करून अंकल-आंटीच्‍या घरी गेले. मी गेले तेव्‍हा आई व एजाजमध्‍ये जोरदार भांडण सूरू होते.
  - नंतर आईही अंकलच्‍या घरी आली. येताच तिने मला मिठीत घेतले. माझ्याही अश्रूंचा बांध फुटला होता. तेव्‍हा तिने मला समजावून सांगितले की, यामध्‍ये तुझी काहीही चुक नाही. सर्व चूक त्‍याची आहे.


  कोर्टाने सुनावली शिक्षा
  - आईने मला सांगितले की, तिने एजाजला घराबाहेर हाकलून लावले आहे. नंतर आईने व मी पोलिस ठाण्‍यात त्‍याच्‍याविरोधात तक्रार दिली आणि अखेर त्‍या नराधमाचे बुरे दिन सुरू झाले.
  - अखेर मार्च 2013मध्‍ये स्‍टेफोर्ड क्राउन कोर्टाने एजाज अख्‍तरला (46) अल्‍पवयीनावर बलात्‍कार आणि लैगिंक शोषण केल्‍याप्रकरणी दोषी ठरवले. व 15 वर्षांची शिक्षा सुनावली.

Trending