आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनू निगमच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढू लागला फॅन, त्याचे वागणे पाहून भडकलेल्या सिंगरने मुरगळला त्याचा हात : Video 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. सिंगर सोनू निगमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सोनू एका इव्हेंटमध्ये दिसतोय. यादरम्यान एक चाहता सोनू निगमसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. चाहता सोनूच्या खांद्यावर हात ठेवतो तेव्हा सोनू भडकतो. यानंतर रागात सोनू त्या चाहत्याचा हात पकडून मुरगळतो. सोनूचे असे वागणे पाहून फॅन चकीत होतो पण त्याचे असे वागणे पाहून त्याला वाटते की, सोनू निगम थट्टा करतोय. पण नंतर सोनूही फॅनसोबत स्मित हास्य करत सेल्फी काढतो. 

 

सोनूचा जन्म हरियानाच्या फरीदाबाद शहरात 30 जुलै 1973 ला झाला. सोनूने गाण्याची सुरुवात स्टेज शोवरुन केली होती. त्याचे वडील अगम निगमही चांगले सिंगर आहेत आणि स्टेजवर परफॉर्म करायचे. सोनूही आपल्या वडिलांसोबत स्टेजवर गाणे गायचा. सोनूने वडिलांसोबत वयाच्या तिस-या वर्षापासून स्टेज शोज करणे सुरु केले होते. नंतर 19 वर्षांचा सोनू प्लेबॅक सिंगर बनण्यासाठी मुंबईत आला. येथे त्याला खुप स्ट्रगल करावा लागला. 1995 मध्ये त्याला छोट्या पडद्यावर सिंगिंग रियलिटी शो 'सारेगामा' होस्ट करण्याची संधी मिळाली. 

 

गुलशन कुमारने दिली होती चित्रपटात गाण्याची संधी 
यानंतर मिळालेल्या प्रसिध्दीनंतर सोनू निगमला लोक ओळखू लागले. नंतर टी-सीरिजचे मालक गुलशन कुमारने त्याला 'बेवफा सनम'मध्ये गाण्याची संधी दिली आणि सोनूने 'अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का' गाण्यातून आपली एक वेगळी ओळख बनवली. सोनूला मोठे यश 1997 मध्ये 'बॉर्डर'चे गाणे 'संदेशे आते है'मधून मिळाली होती. हे गाणे अनु मलिकने कंपोज केले होते. त्याने आतापर्यंत अनेक बॉलिवूड गाणे गायले आहेत, यासोबतच  'दीवाना' (1999), 'याद' (2001), 'जान' (2000) आणि 'चंदा की डोली' (2005) सारखे अनेक शानदार अल्बमही दिले आहेत. सोनू हिंदीसोबतच उर्दू, तमिल, बांग्ला, पंजाबी, मराठी, तेलुगु, भोजपुरी, कन्नड़ आणि उडिया भाषांमध्ये गायला आहे. 

 


 

बातम्या आणखी आहेत...