आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदनाम गल्ल्यांची राणी: Call Girls च्या दुनियेतील लेडी डॉन, अशी बनली गीता ते सोनु पंजाबन, सिनेमातील कॅरेक्टरला दिले तिचे नाव...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - सेक्स रॅकेटच्या धंद्यातील लेडी डॉन सोनू पंजाबन परत एकदा चर्चेत आली आहे. दिल्लीत सेक्स रॅकेट चालवणारी सोनु पंजाबन भलेही तुरूंगात आहे, पण तिचा तो धंदा तिचे नातेवाईक आणि साथिदार चालवत आहेत. सोनु पंजाबन तुरूंगातून आपल्या सेक्स रॅकेटचा धंदा चालवत होती, पण तिच्या या धंद्याला पण पोलिसांनी बंद केले. पोलिसांनी सोनूच्या दोन भावासोबतच त्यांच्या साथिदारांना अटक केले आहे. जाणून घ्या सोनु पंजाबन कोण होती आणि कशी बनली सेक्स रॅकेटची लेडी डॉन...


अशी बनली गीता ते सोनू पंजाबन
> सोनू जन्मापासून गुन्हेगार नव्हती. तिचा जन्म हरियाणीतील रोहतक जिल्ह्यात एका सामान्य कुटुंबात झाला होता. आई-वडिलांनी तिचे नाव गीता असे ठेवले होते. जास्त शिकली नव्हती. परंतु, बोलण्यात पटाईत होती. गोड बोलणे तिचे वैशिष्ट्य होते. 
> गँग्सटर विजयशी संबंध ठेवणे तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. तिला सुरुवातीपासूनच गुंड आणि बदमास वृत्तीचे तरुण आवडत होते. त्यामुळेच, ती विजयच्या संपर्कात आली आणि त्याच्याशी विवाह देखील केला. 
> पती गँगस्टर आणि ती एका ब्युटी पार्लरची मालकीन होती. कुख्यात गँगस्टर श्रीप्रकाश शुक्लाचा सर्वात जवळचा हस्त असलेला विजय पोलिसांच्या नजरेत आला होता. ती गर्भवती असतानाच पोलिसांनी तिचा पती विजयाला गोळीबारात ठार मारले. 
> विजयच्या मृत्यूनंतर गीताच्या वडिलांनी देखील जगाचा निरोप घेतला. अशात गीत आपल्या नवजात मुलासह पूर्णपणे एकटी पडली होती. पैश्यांची चण-चण भासत असल्याने तिने चांगले मार्ग सोडून आपल्या ब्युटी पार्लरमध्ये सेक्स स्कँडल सुरू केले.


इंग्रजी बोलून करायची इम्प्रेस...
मदत मिळत गेल्याने तिने दिल्लीतील साकेत येथे वेश्यावृत्तीचा पहिला अड्डा उघडला. याच ठिकाणी ती वेश्यावृत्तीत येणाऱ्या नवीन मुलींना ट्रेनिंग द्यायची. हायप्रोफाइल ग्राहकांसोबत इंग्रजी बोलण्याचे आणि वागण्याचे ती प्रशिक्षण देत होती. स्वतः देखील धनाढ्य आणि मोठ्या व्यापाऱ्यांना इंग्रजी बोलून ती इम्प्रेस करायची. अशात वेश्यावृत्तीच्या काळ्या बाजारात तिची मागणी वाढत गेली.

 

पुन्हा प्रेमात पडली, तोही मारल्या गेला...
कार चोरणाऱ्या टोळीचा म्होरक्या दीपक याच काळात तिच्या संपर्कात आला. ती दीपकच्या प्रेमात पडली होती. गीता आणि दीपकच्या अफेअरला सुरुवातच झाली होती, की अचानक पोलिसांनी त्याला देखील ठार मारल्याचे वृत्त समोर आले. त्यावेळी दीपकचा भाऊ हेमंत सोनू याने गीताची साथ दिली. तिला आधार दिला. अशात दोघांनी मिळून वेश्यावृत्तीचा काळा कारभार आणखी वाढवला. यानंतर हेमंत सोनू आणि गीता यांनी विवाह केला.


दुसऱ्या पतीचेही एनकाउंटर

> 2006 मध्ये हेमंत सोनू आपल्या इतर दोन सहकाऱ्यांसोबत पोलिस एनकाउंटरमध्ये मारल्या गेला. गीतासाठी हा सर्वात मोठा धक्का होता. तिने हेमंत सोनूला आपल्या अगदी जवळचा मानले होते. त्यामुळेच, तिने आपल्या नावात बदल केला आणि आपले नाव सोनू पंजाबन असे केले. पुढची तीन वर्षे सोनू पंजाबनने सगळा कारभार एकटीने सांभाळला. तिच्या विरोधात अनेक खटले आणि आरोप सुद्धा दाखल झाले. परंतु, ती सर्व प्रकरणांमधून सुटली. सोनूने आपले नेटवर्क मजबूत केले. 
> वेश्यावृत्तीची आणखी दोन नावे भीमानंद आणि नगमा खान या दोघांना 2009 मध्ये अटक करण्यात आली. तेव्हापासून ती आपल्या क्षेत्रात लेडी डॉन म्हणून समोर आली. अशात दिल्लीतच नव्हे, तर देशभर विविध शहरांमध्ये ती कॉल गर्ल्सचा पुरवठा करायला लागली. अनेकवेळा अडकली पण, तरीही सुटण्यात यशस्वी ठरली. दिल्लीच्या पॉश परिसरांमध्ये तिने घरे आणि प्रॉपर्टी विकत घेतली होती. व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावरून तिने आपल्या धंद्याला तंत्रज्ञानाची जोड दिली.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, अभिनेत्रींचा सुद्धा पुरवठा करायची सोनू पंजाबन...

 

बातम्या आणखी आहेत...