आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सिम्बा' चे सक्सेस एन्जॉय करत असलेला सोनू सूद आहे दुःखी, आई वडीलांची आठवण काढत लिहिले 3 पानांचे इमोशनल पत्र - 'देवा खूप वाईट आहेस तू' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या आपली फिल्म 'सिम्बा' चे सक्सेस एन्जॉय करत आहे पण आपल्या पेरेंट्सला खूप मिस करत आहे तो (त्याचे आई वडील आता हयात नाहीत). सोनूने आपल्या या भावना सोशल मीडियावर पेरेंट्ससाठी एक इमोशनल लेटर लिहून व्यक्त केल्या. सोनूने लिहिले, "मिस यू मॉम एंड डैड, आज जेव्हा अनेक लोक मला माझ्या चित्रपटासाठी शुभेच्छासाठी फोन करत आहेत तेव्हा सगळ्यांमध्ये मला तुमच्या फोन कॉलची खूप आठवण येत आहे. नेहमी माझ्या छोट्या छोट्या यशांसाठीही तुमचा मला फोन यायचा. जशी माझी फिल्म साइन आणि पहिल्या अवॉर्डवर मला तुमचा कॉल येणे. एवढेच काय तर कॉलेजमधेही मेडल मिळाल्यावर तुमचा फोन यायचा, जो माझ्यासाठी खूप गरजेचं होता". 

 

स्वतःला एकटा समजतो सोनू सूद...
- सोनूने पुढे लिहिले, "तुमचे ते फोनकॉल्स माझ्यासाठी हार्डवर्क करण्याचे मोटिवेशन होते जेणेकरून तुम्हाला प्राउड फील व्हावे. तुमचे ते फोन्सच माझ्यासाठी लव्हली मूमेंट होते. आज जेव्हा मला सक्सेस मिळाले आहे तेव्हा मला खूप विचित्र वाटत आहे. तुमच्याविना मी एकटा एकटा आहे. माझी फिल्म पाहून तुमची स्माइलचा माझ्यासाठी खूप मोठा रिवॉर्ड होती"
- "आज तुमच्याविना मला सर्वकाही अर्धवट वाटते. काश मी तुमच्यासोबत थिएटरमध्ये बसून फिल्म पाहू शकलो असतो. त्या टाळ्या त्या शिट्या माझ्या  स्ट्रगलचा काळ दाखवतात. जेव्हा मी तुमच्यापासून दूर होतो"
- "मला कळत नाही आयुष्यात आपल्याला गोष्टी नेहमी इतक्या उशिरा का मिळतात. जेव्हा आपण पेरेंट्ससाठी काहीतरी करू इच्छितो आणि जेव्हा ते मिळते तेव्हा आई वडीलसोबत नसतात. देवाचे आपले प्लान्स असतात. तेव्हा देवाने माझ्यासाठी हेच का निवडले. त्यावेळी वाटले, देवा खूप वाईट आहेस रे तू " 
- "कधी कधी मला वाटते काश मी हे सर्व आधी करू शकलो असतो. मला माफ करा आई बाबा, मी तुम्हाला रोज मिस करतो, जेव्हाही मला सक्सेस मिळते किंवा जेव्हाही मी फेल होतो. मी नेहमी हार्डवर्क कारेन जेणेकरून तुम्ही नेहमी माझ्यावर प्राउड फील कराल. आज जिथेही आहात खुश रहा. मी तुम्हाला नेहमी मिस करेन"
- 30 जुलै 1973 ला मोगा (पंजाब) मध्ये जन्मलेला सोनू आपला बर्थडे सेलिब्रेट करत नाही. यामागे एक इमोशनल कारण आहे, जे स्वतः सोनूने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, जेव्हा त्याच्या आईचे निधन झाले, तेव्हापासून त्याने कधीच आपला बर्थडे सेलिब्रेट केला नाही. 

View this post on Instagram

Miss u Mom n Dad ❤️❤️

A post shared by Sonu Sood (@sonu_sood) on Jan 11, 2019 at 7:17am PST

 

लाइमलाइटपासून दूर राहते सोनूची पत्नी... 
- सोनू सूदच्या पत्नीचे नाव सोनाली आहे. त्यांच्या लग्नाला आता 23 वर्ष होणार आहेत. पण सोनाली लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. सोनूची भेट सोनाली तेव्हा झाली, जेव्हा तो नागपुरमध्ये इंजीनियरिंग करत होता. 
- दोघांनी 25 सप्टेंबर, 1996 मध्ये लग्न केले होते. दोघे वेगवेगळ्या राज्यातील आहेत. सोनू पंजाबी आहे तर सोनाली तेलगू आहे. एकदा सोनू म्हणला होता की, सोनाली त्याच्या आयुष्यात येणारी पहिली मुलगी आहे.  
- दोघांची दोन मुले अयान आणि ईशांत आहेत. सोनूच्या दोन बहिणीही आहेत, मोनिका आणि मालविका. यातील एकीचे लग्न पंजाबमध्ये झाले तर दुसरी लग्नानंतर परदेशात सेटल झाली आहे. 

 

या चित्रपटात काम केले आहे... 
- सोनूने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात 1999 मध्ये तामिळ फिल्म 'कल्लाजहगर' ने केली होती. 2002 मध्ये त्याची पहिली बॉलिवूड फिल्म ‘शहीद-ए-आजम’ रिलीज झाली. पण त्याला खरी ओळख फिल्म 'युवा' ने मिळाली.  
- नंतर सोनूने 'कहां हो तुम', 'शीशा', 'आशिक बनाया आपने', 'जोधा अकबर', 'एक विवाह ऐसा भी', 'दबंग', 'बुड्ढा होगा तेरा बाप', 'मैक्सिमम', 'रमैया वस्तावैया', 'आर...राजकुमार' आणि 'हॅप्पी न्यू ईयर' अशा अनेक चित्रपटात काम केले. सध्या त्याने रणवीर सिंह स्टारर 'सिम्बा' मधेही काम केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...