आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : अभिनेता सोनू सूदने बँकॉकमध्ये सुरु असलेल्या अन्युअल स्पेशल ओलंपिक्स एशिया पॅसिफिकसाठी भारतीय बॅडमिंटन टीमची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनू इंडियन टीमला मोटिव्हेट करण्याबरोबरच त्यांच्या ट्रॅव्हलिंगचा पूर्ण खर्चदेखील उचलत आहे.
सतत संपर्कात आहे सोनू...
आयएएनएसच्या बातमीनुसार सोनू सतत टीमच्या कोचच्या संपर्कात आहे अमी त्यांच्या ट्रेनिंगमध्येही वैयक्तिक लक्ष देत आहे. जेणेकरून टोर्नामेंटसाठी टीमला कधी कोणत्या गोष्टीची गरज पडत असेल तो ती उपलब्ध करून देऊ शकेल. ही स्पर्धा 13 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे, जी 16 नोव्हेंबरपर्यंत चालेल.
अनेकदा मदत करतो सोनू...
हे पहिल्यांदा नाहीये जेव्हा सोनूने एखादे प्रेरणादायक काम केले आहे. यापूर्वीही त्याने अनेकदा गरजवंतांना मदत केली आहे. मागच्यावर्षीही त्याने मुली आणि वयस्करांसाठी सायकल दिल्या होत्या.
6 खेळाडू करत आहेत देशाचे प्रतिनिधित्व...
एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत सोनू म्हणाला, 'मी टीमला शुभेच्छा देतो, मला पूर्ण विश्वास आहे की, ते देशाचा मान आणखी वाढवतील. माझा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे. सूत्रांनुसार, 'सोनू नेहमीच शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा त्याला माहिती झाले की, आपली इंडियन बॅडमिंटन टीम या महत्वपूर्ण टोर्नामेंटमध्ये भाग घेत आहे. तर त्याने त्वरित मदतीसाठी आपण तयार असल्याचे सांगितले. तो खूप उत्साहित आहे की, कशाप्रकारे आपले हे 6 खेळाडू आपला गेम खेळतील आणि देशाला गौरवीत करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.