Gadget News / सोनीने लॉन्च केला जगातील सर्वात लहान आणि हलका प्रीमिअम कॅमेरा, सोनी RX0 II ची किंमत फक्त 57,990 रुपये


हा कॅमरा शॉकप्रूफ आहे, 2 मीटरच्या उंचीवरूनही पडल्याने याला काही होणार नाही

दिव्य मराठी वेब

Jul 09,2019 04:04:00 PM IST

गॅजेट डेस्क- सोनी कंपनीने आपल्या पॉप्युलर कॉम्पॅक्ट कॅमरा रेंजच्या लेटेस्ट एडिशनमध्ये सोनी RX0 II ला भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. कंपनीचा दावा आहे की, हा जगातील सर्वात लहान आणि हलका अल्ट्रा प्रीमिअम कॉम्पॅक्ट कॅमरा आहे. 132 ग्राम वजनाचा हा कॅमरा सोनी RX0 चे अपग्रेड व्हर्जन आहे. याचे डायमेंशन फक्त 59*40.5*35 एमएम आहे. या लहान कॅमेराची फीचर्स लिस्ट खूप लांब आहे, जसे स्क्रीनला 180 डिग्री फिरवले जाऊ शकते. त्याशिवाय कॅमेरा वॉटरप्रूफ (IPX8), डस्टप्रूफ (IP6X), शॉकप्रूफ आणि क्रशप्रूफ (200 किलो पर्यंत फोर्स झेलण्याची ताकत) देखील आहे.


सोनी RX0 II मध्ये 15.3 मेगापिक्सलचा एक्समोर आरसी सीमोस इमेज सेंसर आणि अॅडवांस्ड BIONZ X इमेंज प्रोसेसिंग इंजिन आहे.

मार्चमध्ये ग्लोबली लॉन्च झालेल्या सोनी RX0 II ची किमंत 48,000 रुपये होती. सोनी RX0 प्रमाणे यात ही 4के 30 पिक्सल व्हिडिओ शूट केले जाऊ शतके.


चालताना ऑब्जेक्टचा फुटेज घेण्यासाठी यात इन-बॉडी इलेक्ट्रॉनिक स्टेबिलाइजेशन फीचर दिले आहे, याशिवाय यात 100fps पर्यंत सुपर स्लो मोशन रेकॉर्डिंग, अनकम्प्रेस्ड 4K एचडीएमआई आउटपुट आणि प्रॉक्सी मूवी रिकॉर्डिंग सारखे फीचर्स आहेत.

सोनी RX0 II ची किंमत 57,990 रुपये आहे. याची विक्री 15 जुलैपासून सुरू होईल. याला सोनी सेंटर, अल्फा फ्लॅगशिप, सोनी ऑथोराइज्ड डीलर आणि मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स स्टोरवरून खरेली केले जाऊ शकते.

X
COMMENT