आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरवर ट्रेंड झाले #बॉयकाॅट केबीसी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याच्या वादामुळे सोनी टीव्हीने मागितली माफी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : केबीसी-11 ला शिवाजी महाराजांशी निगडित एक प्रश्न इतका महाग पडला की, ट्विटरवर त्यांच्याविरोधात बॉयकाॅट केबीसी हॅशटॅग ट्रेंड करू लागले. झाले असे की त्या प्रश्नामध्ये पूर्ण नाव न लिहिता केवळ 'शिवाजी' लिहिले गेले होते. मात्र इतर ऑप्शनमध्ये दिलेल्या राजांच्या नावापुढे त्यांचे संबोधन लिहिलेले होते.  

हा होता प्रश्न आणि ऑप्शन... 
केबीसीच्या 6 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये प्रश विचारला गेला, मुघल प्रशासक औरंगजेबाचे समकालीन कोण होते ? ऑप्शनमध्ये महाराणा प्रताप, राणा सांगा, महाराजा रंजीत सिंह आणि 'शिवाजी' लिहिले होते. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि ट्विटरवर #बॉयकाॅट केबीसी सोनी टीव्ही ट्रेंड करू लागले. 

ट्विटरवर केले गेले शेअर... 
यानंतर सोनी टीव्हीने मंगळवारी टेलीकास्ट झालेल्या केबीसी-11 च्या एपिसोडमध्ये माफी मागितली. सोनी टीव्हीने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले - बुधवारी केबीसी एपिसोडदरम्यान चुकून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव चुकीच्या पद्धतीने लिहिले गेले होते. याचा आम्हाला पश्चात्ताप झाला आहे. आम्ही प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन मागच्या एपिसोडदरम्यान स्क्रॉलच्या माध्यमाने खंत व्यक्त केली होती.