आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅन कार्डसाठी आता 10-10 दिवस वाट पाहण्याची नाही गरज, अवघ्या 4 तासांत काढण्याची सुविधा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सध्या पॅन कार्ड तयार करण्यासाठी किमान 10 दिवसांचा कालावधी लागतो. काहीवेळा आपल्या घरी येण्यासाठी 15 दिवस लागू शकतात. परंतु, आता पॅन कार्डसाठी इतके दिवस वाट पाहण्याची गरज नाही. हे कार्ड अवघ्या 4 तासांत मिळेल अशी सुविधा आयकर विभाग देणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी) चे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी नवी दिल्ली येथील कार्यक्रमानंतर ही माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही एक नवीन यंत्र समोर आणत आहोत. त्यासाठी आपल्याला आधार कार्ड देणे आवश्यक आहे.  त्यानंतर चार तासांच्या आत ई-पॅन मिळेल. चंद्रा म्हणाले की सीबीडीटी लवकरच चार तासांत ई-पॅन देणे सुरू करणार आहे. पण, ही सुविधा सुरू होण्यासाठी आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. 
 

आयकर रिटर्नमध्ये 50% वाढ - नोटबंदीचा परिणाम

चंद्रा यांनी सांगितले की, 2018-19 या निर्धारीत वर्षात आयकर रिटर्न (आयटीआर) मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सीआयआयच्या एका कार्यक्रमांतर्गत ही माहिती देत चंद्रा यांनी सांगितले की, नोटबंदीचा परिणाम आहे. ते म्हणाले की देशातील कर क्षेत्र वाढविण्यासाठी नोटबंदी अतिशय फायदेशीर होती. आम्हाला यावर्षी 6.08 कोटी आयटीआर मिळाला आहेत. जो मागील वर्षी याच कालावधीत मिळालेल्या आयटीआर पेक्षा 50 टक्के अधिक आहे. चालू आर्थिक वर्षादरम्यान महसूल विभाग 11.5 लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर जमा करण्याचा एक उद्देश साध्य करण्यात येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. चंद्रा म्हणाले की, 'आमचा एकूण थेट करामध्ये 16.5 टक्के आणि निव्वळ थेट करामध्ये 14.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे हे साफ होते की, नोटबंदीची कर वाढविण्याची मदत झाली आहे.' ते म्हणाले की, '' आतापर्यंत एकूण प्रत्यक्ष करवसुलीचा अर्थसंकल्पीय अंदाज 48 टक्के आहे.'' त्यांनी सांगितले की, नोटबंदीमुळे कॉर्पोरेट करदात्यांची संख्या गेल्यावर्षीच्या सात लाखाच्या तुलनेत वाढून आठ लाखापर्यंत झाली आहे.

 

पुढे वाचा - 2.27 कोटीचा रिफंड...

बातम्या आणखी आहेत...