आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sooryavanshi Trailer Launch: Akshay Kumar Slams A Journalist For Asking A Wrong Question To Ranveer Singh

ट्रेलर लाँचवेळी 'कमिना' म्हणत रिपोर्टरने केला रणवीरचा अपमान, अक्षय म्हणाला - 'तुम्ही फार चुकीचं बोलत आहात'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी 'सूर्यवंशी' या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये अॅक्शनची ट्रीट प्रेक्षकांना मिळाली आहे. चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना कैफ, अजय देवगन, रणवीर सिंग महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ट्रेलर लाँच इव्हेंटला कलाकारांसोबत करण जोहर आणि रोहित शेट्टी हजर होते. यावेळी या सर्व कलाकारांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी, एका पत्रकाराने रणवीर सिंगला असा प्रश्न विचारला, ज्यावर अक्षय कुमार संतापल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही असा प्रश्न विचारु शकत नाही, असं अक्षयने यावेळी म्हटलं. 


एका पत्रकाराने रणवीरला प्रश्न केला की, 'रणवीर तू या इंडस्ट्रीमधला सगळ्यात मोठा कमिना आहेस', असं तुला वाटतं का? त्याचा हा प्रश्न ऐकल्यानंतर अक्षय कुमार संतापल्याचं पाहायला मिळालं. 'तुम्ही फार चुकीचं बोलत आहात. हा केवळ चित्रपटातील संवाद आहे. प्रत्यक्षात तसं नाहीये. तुम्ही दोन्ही गोष्टींचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करु नका. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही असे प्रश्न विचारु नका', असं अक्षय म्हणाला.

अक्षय रणवीरच्या बचावासाठी धावून आल्याने रणवीरला थोडे हायसे वाटले.   “माझा अक्की, मला वाचविण्यासाठी कायम माझा अक्की येईल”, असं रणवीर विनोदी अंदाजात म्हणाला.


24 मार्च रोजी प्रदर्शित होणा-या 'सूर्यवंशी' या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट सिंघम आणि सिंबाचा सिक्वेल आहे त्यामुळे अजय देवगण आणि रणवीर सिंगही चित्रपटाच्या काही भागात दिसणार आहेत. अक्षयसोबत कतरिना कैफची जोडी या चित्रपटात दिसणार असून 24 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...