आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : 'हाउसफुल 4' आणि 'मरजावां' यांसारख्या चित्रपटांचा साउंड टेक्नीशियन निमिष पिलंकरचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. ही बातमी तेव्हा समोर आली जेव्हा ऑस्कर विजेता साउंड मिक्सर रसूल पोकुट्टीने चित्रपट समीक्षक आणि पत्रकार खालिद मोहम्मद यांच्या ट्वीटला रिट्वीट केले. 29 वर्षांच्या निमिषच्या मृत्यूवर त्यांनी प्रश्न केला की, कुणाला टेक्नीशियन्सची चिंता आहे का ?
बातम्यांनुसार, निमिष मागील अनेक दिवसांपासून दिवसरात्र सलग एका वेब सीरीजसाठी काम करत होता. ज्यामुळे तो खूप जास्त तणावाखाली होता, याच कारणामुळे निमिषचे ब्लड प्रेशर वाढले आणि ब्रेन हॅमरेज झाले.
खालिद यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, 'साउंड टेक्नीशियन निमिश पिलंकर, ज्यांचे वय 29 वर्ष आहे, त्याचे निधन झाले आहे. ब्रेन हॅमरेज, ब्लड प्रेशरमुळे झाले. टेक्निशियन बॉलिवूड सिनेमाचा कणा आहेत, पण कुणाला त्यांची काळजी असते ?'
तसेच रसूलनेही या गोष्टीचे समर्थन करत लिहिले, 'हृदयद्रावक बातमी आहे. खालिद तुम्ही हा मुद्दा मंडलात यासाठी धन्यवाद. आम्ही तुमच्या सोबत आहोत. डियर बॉलिवूड, आम्हाला खरा चित्रपटात पाहण्यासाठी आणखी किती सॅक्रिफाइज करावे लागतील. माझ्या मित्रा उत्तर आपल्या आसपासच आहे.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.