आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंट्रोव्हर्सी/सेमीफायनलमध्ये मितालीला बाहेर ठेवण्यावर गांगुली म्हणाला, माझ्यासोबत देखील असेच केले होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुली महिला टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये मिताली राजला प्लेइंग-11 मधून बाहेर ठेवण्याचे काहीच आश्चर्य वाटले नाही. महिला टीमला सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभव स्विकारावा लागला होता. गांगुली म्हणाला, "टीम इंडियाचे कर्णधारपद स्विकारल्यानंतर मलाही बाहेर काढले होते. मी मितालीला बाहेर पाहिले तेव्हा तिला म्हणालो-आमच्या ग्रुपमध्ये स्वागत आहे."

 

ग्रेग चॅपल भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना गांगुलीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्याने पाकिस्तानविरुद्ध 2006 मध्ये खेळलेल्या दूसऱ्या टेस्टची एक आठवण सांगितली, "कर्णधार तुम्हाला बाहेर बसायला सांगतो तेव्हा तुम्ही तसेच केले पाहिजे. मी फैसलाबादमध्ये असेच केले होते. त्यावेळेस मी सर्वश्रेष्ट कामगिरी करत होतो तरी देखील मी 15 महिने मैदानाबाहेर होतो."

 

तर भारत फायनलमध्ये गेला असता 
गांगुली कोलकाताच्या क्लबमध्ये झालेल्या एका कार्यक्रम म्हणाला, "यामुळे मितालीचे करियर संपणार नाही. लक्षात ठेवा की तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. मला वाटले होते की, भारत फायनलपर्यंत जाईल."

 

धोनी एक चॅम्पियन आहे
दुसऱ्या बाजुला, गांगुली महेंद्रसिंह धोनीची प्रशंसा करताना म्हणाला की, धोनी अजूनही मोठे षटकार  लावण्यात सक्षम आहे. तो एक चॅम्पियन आहे. वर्ल्ड टी-20 (2007) मधल्या विजयानंतर त्याने उत्तम कामगिरी केली. मी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, सगळ्यांना वाटते की, धोनी उत्तम खेळत राहावा. तो एक महान क्रिकेटपटू आहे."

 

बातम्या आणखी आहेत...