आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेब्यू : ‘सॅटेलाइट शंकर’द्वारे साऊथ अॅक्ट्रेस मेघा आकाश करणार आहे बॉलिवूडमध्ये एन्ट्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड डेस्कः इरफान कमल दिग्दर्शित ‘सॅटेलाइट शंकर’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मेघा आकाश बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात अभिनेता सूरज पंचोली सैनिकाच्या भूमिकेत असून मेघा सूरजच्या प्रेयसीची भूमिका वठवणार आहे. यापूर्वी मेघाने तामिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्ये सुपरस्टार धनुषसह अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. इतकेच नाही तर ती रजनीकांत यांच्या आगामी ‘पेट्‌टा’ या चित्रपटातही झळकणार आहे. ‘सॅटेलाइट शंकर’द्वारे तिला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळत आहे.


मेघाच्या निवडीबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक इरफान म्हणतात, ‘मेघा तिची मुलगी आहे, जिच्या शोधात आम्ही होतो. तिला बघताच क्षणी तिलाच चित्रपटासाठी साइन करण्याचा मी निर्णय घेतला.’ या चित्रपटाचे जास्तीत जास्त शूटिंग हे नॉर्थ इंडियात होणार आहे. 

 

मेघा सांगते, ‘मला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या, पण ‘सॅटेलाइट शंकर’मध्ये काहीतरी वेगळेपण आहे. हा चित्रपट मोठ्या स्केलवर तयार होतोय. यात काम करण्यासाठी मी अतिशय उत्साहित आहे.’

बातम्या आणखी आहेत...