आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्रीने प्रभूदेवासाठी ख्रिश्चन धर्म सोडून केला होता हिंदू धर्माचा स्वीकार, जाणून घ्या हिच्याविषयी A to Z 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - साऊथची सर्वात हॉट अॅक्ट्रेस नयनतारा आता साऊथची सर्वाधिक चर्चित अॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. नयनतारा आज तिचा 35 वा वाढदिवस (18 नोव्हेंबर 1984) साजरा करत आहे. बंगळुरु मध्ये जन्मलेली नयनतारा ख्रिश्चन आहे. तिचे खरे नाव डायना मरियम कुरियन आहे. नयनताराचे वडील कुरियन कोदियात्तु एअरफोर्समध्ये होते, त्यामुळे नयनताराचे देशातील विविध शहरांमध्ये शिक्षण झाले. तिचे शिक्षण चेन्नी, जामनगर, थिरुवला आणि दिल्लीत झाले. नयनतारा साऊथमधील सध्याच्या घडीची सर्वात महागडी स्टार आहे. नयनतारा एका फिल्मसाठी 3 कोटी रुपये चार्ज करते. तिच्याकडे 68 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे.

  • प्रभुदेवासोबत लग्नासाठी बदलला होता धर्म...

नयनतारा 2008 मध्ये अॅक्टर, डायरेक्टर, डान्सर प्रभुदेवाच्या प्रेमात पडली होती. प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी तिने हिंदू धर्म स्वीकारला होता. 2010 मध्ये प्रभुदेवाची पत्नी लताने फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली होती, त्यात आरोप केला होता की प्रभुदेवा, नयनतारासोबत लिव-इनमध्ये राहात आहे. त्यानंतर लताने धमकी दिली होती, की प्रभुदेवाने नयनतारासोबत लग्न केले तर ती आमरण उपोषण करेल. काही महिला संघटनांनी नयनताराला तामिळ संस्कृती धुळीस मिळवत असल्याचा आरोप करत तिच्याविरोधात आंदोलन केले होते. तिचे पुतळेही जाळण्यात आले होते.

  • 2011 मध्ये प्रभुदेवाने घेतला घटस्फोट

नयनतारासोबत अफेअर सुरु झाल्यानंतर प्रभुदेवाना त्याचे 16 वर्षे जुने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता. जुलै 2011 मध्ये प्रभुदेवाना त्याची पत्नी लताला घटस्फोट दिला. यानंतर 2012 मध्ये नयनताराने म्हटले की, आता प्रभुदेवासोबत माझे सर्व संबंध संपले आहेत. तिनेही त्याच्यासोबतचे संबंध तोडले.

  • प्रभुदेवा झाला होता दिवाळखोर

पत्नी लताला घटस्फोट दिल्यानंतर प्रभुदेवा अक्षरशः दिवाळखोर झाल्याच्या स्थितीत होता. त्याला पत्नीला 10 लाख रुपये निर्वाह भत्त्यासोबत प्रॉपर्टीही द्यावी लागली होती. याची एकूण किंमत 20-25 कोटी रुपये होती. त्यासोबत त्याने दोन कार आणि त्याची सर्व संपत्तीही लताला दिली होती. प्रभुदेवाला तीन मुले होती, 2008 मध्ये त्याच्या एका मुलाचा कँसरमुळे मृत्यु झाला होता.

  • अॅक्टर सिंबूसोबतच्या Kiss चा फोटो ठरला होता वादग्रस्त

नयनतारा तिच्या हॉट भूमिकांसाठी प्रसिद्ध होती, त्यासोबतच अॅक्टर सिंबूसोबत लिपलॉकचा एक फोटो वादग्रस्त ठरला होता. या फोटोसाठी नयनतारा आणि सिंबूला माफी मागण्याचीही मागणी करण्यात आली होती. 

  • मंदिरात सलवार सूटमध्ये गेल्याने झाला होता वाद

2009 मध्ये नयनतारा केरळमधील ओट्टापालम येथील अम्मान मंदिरात साडी ऐवजी सलवार सुटमध्ये पोहोचली होती. साडी नेसली नसल्यामुळे प्रशासनासह भक्तांनी नयनताराला मंदिरात प्रवेश नाकारला होता. साऊथमध्ये बहुतेक मंदिरात महिला या साडीमध्येच जातात, या घटनेनंतर लोकांनी नयनताराला एक बॉक्स भरुन साड्या पाठवल्या होत्या.

  • 'बिल्ला'नंतर चमकले होते नशीब

2007 मध्ये प्रदर्शित बिल्ला चित्रपटानंतर नयनताराचा किस्मतचा सितारा चमकला. त्यानंतर तिने डझनभर हिट फिल्म दिल्या होत्या. आता तिचे नाव साऊथच्या सर्वात हॉट अॅक्ट्रेसमध्ये घेतले जाते.

  • नयनताराच्या सुपरहिट फिल्मचा बॉलिवूडमध्ये रिमेक

नयनताराची सर्वाधिक सुपरहिट फिल्म ठरली होती, 'चंद्रमुखी'. या फिल्मचा हिंदी रिमेक 'भुलभुलैय्या' नावाने रिलीज झाला होता. या स्क्रिप्टने साऊथच नाही तर बॉलिवूडमध्येही धमाल केली होती.

  • महागड्या कार आणि आलिशान घराची मालकिन

नयनताराकडे बीएमडब्ल्यू एक्स 6 (किंमत साधारण 76 लाख) आणि ऑडी टीटी रोडस्टर (60 लाख) सारख्या लक्झरी कार आहेत.  याशिवाय थिरुवला, केरळ येथे आलिशान बंगले आणि कोच्ची येथे प्रेस्टिज नेप्च्यून कोर्टयार्ड येथे शानदार फ्लॅट आहे. याशिवाय नयनतारा कित्येक ब्रँड्ससाठी एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही कमाई करते. यामध्ये जीआरटी ज्वेलर्स सारख्या कंपन्या आहेत. एका माहितीनुसार नयनताराने 50 सेकंदांच्या एका टीव्ही अॅडसाठी 5 कोटी रुपये चार्ज केले होते. या अॅडची शुटिंग दोन दिवस चालली होती.  

बातम्या आणखी आहेत...