आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे नित्यानंदबरोबर लीक व्हिडिओमध्ये दिसलेली साऊथ अॅक्ट्रेस, संन्यास घेऊन बनली 'नित्यानंदमयी'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - वाघ आणि गायींनी संस्कृत तसेच तमिळ भाषा बोलायला लावण्याच्या दाव्याने नित्यानंद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नित्यानंदचा 2010 मध्ये सेक्स व्हिडिओ लीक झाला होता. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत तामिळ अॅक्ट्रेस रंजीता होती. या व्हिडिओमध्ये नित्यानंद अॅक्ट्रेस रंजीतासोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत होता. दोघांनीही तेव्हा दावा केला होता की हा व्हिडिओ मॉर्फ्ड केलेला आहे. पण सेंट्रल फॉरेंन्सिक लॅबने व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती नित्यानंद आणि महिला रंजीताच असल्याचे कन्फर्म केले होते. 


कोण आहे रंजीता 
- रंजीताचे खरे नाव सिलमिसा उर्फ श्रीवल्ली आहे. 4 जून 1975 ला जन्मलेली रंजीता हॉलीबॉल प्लेअर होती. 
- डायरेक्टर पी भारतीराजा याने 1992 मध्ये तिला तामिळ फिल्म नादोडी थेंडरलमधून कॉलिवूडमध्ये लाँच केले होते. 
- रंजीताना तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड फिल्ममध्ये काम केले होते.


2000 मध्ये मेजरसोबत केले होते लग्न 
- 1999 मध्ये रंजीताने फिल्ममध्ये काम करणे बंद केले होते. त्यानंतर 2000 मध्ये तिने आर्मी मेजर राकेश मेननसोबत लग्न केले होते. 
- राकेश मेनन आणि रंजीता यांची कॉलेजच्या दिवसांपासूनची ओळख होती. लग्नानंतर साधारण एक वर्षे रंजीताना फिल्ममधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर 2001 मध्ये तिने पुन्हा फिल्ममध्ये काम सुरु केले. 
- मात्र यावेळी तिला लीड रोल ऐवजी सपोर्टिंग रोल मिळाले. 
- रंजीताना तामिळ टीव्ही सीरियल 'कृष्णदासी'मध्येही काम केले होते.


2007 मध्ये झाला घटस्फोट 
- रंजीताचे पतीसोबत फार दिवस पटले नाही. सततच्या भांडणानंतर 2007 मध्ये रंजीताना पती राकेश मेननला घटस्फोट दिला. 
- त्यानतंर 2010 मध्ये रंजीता आणि नित्यानंद यांच्या कथित सेक्स व्हिडिओ साऊथच्या एका टीव्ही चॅनलवर दाखवण्यात आला. 
- हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रंजीताने व्हिडिओमध्ये दिसणारी मी नाही, असा दावा केला होता. मात्र या व्हिडिओ प्रकरणानंतर रंजीताचा ठिकाणा हा नित्यानंदचा आश्रमच बनला. 
- 27 डिसेंबर 2013 ला रंजीताने संन्यास घेतला आणि ती बंगळुरु जवळ असलेल्या स्वामी नित्यानंदच्या आश्रमात राहु लागली होती. 
- सन्यासी झाल्यानंतर रंजीताने तिचे नाव 'नित्यानंदमयी' केले होते. सध्या ती नित्यानंद ध्यानपीठम येथेच राहाते.


हा होता रंजीताचा शेवटचा चित्रपट.. 
रंजिताचा शेवटचा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. मनीरत्नम यांच्या 'रावनन'मध्ये रंजीता दिसली होती. 
- तिने पोंदत्ती राज्यम (1992), मदुरई मीनाक्षी (1993), कॅप्टन (1994), करुप्पा निला (1995), पुरुशन पोंदत्ती (1996), उरिमई पोर (1997), पूवासम (1999), मायन (2001), सेल्वम (2005), माया कन्नडी (2007), सरोजा (2008) आणि विल्लू (2009) सारख्या चित्रपटांध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कथित सेक्स व्हिडिओपासून रंजीताचे अॅक्ट्रेस ते सन्यासीपर्यंतचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...