Home | News | South Actress Real Name: Anushka Shetty To Nayanthara Here

'बाहुबली'च्या 'देवसेना'पासून ते नयनतारापर्यंत, हे आहे दाक्षिणात्य अभिनेत्रींचे खरे नाव

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 12:00 AM IST

अनुष्का शेट्टी आज 38 वर्षांची झाली आहे.

 • South Actress Real Name: Anushka Shetty To Nayanthara Here

  मुंबई/हैदराबादः अभिनेत्री अनुष्का शेट्टी आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करतेय. एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली' या सिनेमात देवसेनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टीला तिच्या ख-या नावाऐवजी सिनेमातील नावाने जास्त ओळखतात. अनुष्का हे तिचे ऑनस्क्रिन नाव आहे. पण तिचे खरे नाव स्वीटी शेट्टी असल्याचे क्वचितच लोकांना ठाऊक आहे. सिनेसृष्टीतील पदार्पणाच्यावेळी तिने नाव बदलले होते. साऊथ फिल्म इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी नाव बदलले. या यादीत अनुष्काशिवाय नयनतारा, नगमा, रंभा, जयाप्रदा, सिमरन, रोजा आणि भूमिका चावला या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे.

  या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सांगतोय, साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्रींची खरे नावे..


  अनुष्का शेट्टी
  7 नोव्हेंबर 1981 रोजी मंगळूरू, कर्नाटक येथे जन्मलेल्या अनुष्काने 2005 साली 'सुपर' या तेलगू सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने साऊथमध्ये अनेक सिनेमांत अभिनय केला. तामिळ आणि तेलगू सिनेसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. 34 वर्षीय अनुष्काने बाहुबली व्यतिरिक्त Vikramarkudu (2006), अरुंधति (2009), वेदम (2010), रुद्रमादेवी (2015) आणि सिंघम सीरिज सारख्या हिट सिनेमांत काम केले आहे.


  पुढे वाचा, डायना मरियम बनली 'नयनतारा' तर नंदिता झाली 'नगमा'...

 • South Actress Real Name: Anushka Shetty To Nayanthara Here

  नयनताराचा जन्म 18 नोव्हेंबर 1984 रोजी झाला. रजनीकांत यांच्या ‘चंद्रमुखी’ या ब्लॉकबस्टर सिनेमात झळकलेल्या अभिनेत्री नयनताराने प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला होता. नयनतारा ख्रिश्चन असून तिचा जन्म बंगळुरुच्या एका ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. 2003 मध्ये 'मनसिनक्कारे' या मल्याळम सिनेमातून करिअरला सुरुवात करणारी नयनताराचे खरे नाव डायना मरियम कुरियन आहे. तिने साऊथच्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. यामध्ये 'मनसिनक्कारे' (2003), 'रप्पकल' (2005), 'गजनी' (2005), 'योगी' (2007), 'बिल्ला' (2007) सह अनेक सिनेमांचा समावेश आहे. 

   

 • South Actress Real Name: Anushka Shetty To Nayanthara Here

  1990 साली ‘बागी’ या सिनेमाद्वारे करिअरची सुरुवात करणा-या नगमाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेतील 50 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला. बॉलिवूडमध्ये तिला फारसे यश मिळाले नाही. हिंदीत तिने  'बागी' (1990), 'यलगार' (1992), 'सुहाग' (1994), 'लाल बादशाह' (1999), 'कुंवारा' (2000), 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' (2004) या सिनेमांमध्ये अभिनय केला. सिनेमांव्यतिरिक्त लव्ह लाईफमुळे नगमा चर्चेत राहिली. तिचे नाव क्रिकेटर सौरव गांगुलीसोबत जुळले होते. गांगुलीव्यतिरिक्त भोजपुरी अॅक्टर रवीसोबतही तिचे अफेअर गाजले होते. नगमाने अद्याप लग्न केलेले नाही.  
   

   

 • South Actress Real Name: Anushka Shetty To Nayanthara Here

  5 जून, 1976 रोजी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे जन्मलेल्या रंभाचे खरे नाव विजयलक्ष्मी आहे. 1992 साली  'आ ओकट्टी अडक्कु' या तेलगू सिनेमाद्वारे तिने डेब्यू केले होते. 17 बॉलिवूड आणि 100 हून अधिक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करणारी रंभा आता सिनेसृष्टीपासून दूर असून वैवाहिक आयुष्य जगत आहे. तिला लान्या आणि साशा या दोन मुली आहेत.  रंभाने 8 एप्रिल, 2010 रोजी बिझनेसमन इंद्राण पद्मनाथनसोबत तिरुमाला येथे लग्न थाटले होते.  

   

 • South Actress Real Name: Anushka Shetty To Nayanthara Here

  साऊथ इंडियन अॅक्ट्रेस आणि पॉलिटिशियन (एमएलए) रोजाने 10 ऑगस्ट 2002 रोजी तामिळ दिग्दर्शक आरके सेल्वामनीसोबत लग्न थाटले. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 2014 च्या निवडणुकीत रोजा नागरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक जिंकली होती. तिचा पहिली सिनेमा 'प्रेमा थापसु' हा होता. या सिनेमात राजेन्द्र प्रसादसोबत तिची जोडी जमली होती. 

   

 • South Actress Real Name: Anushka Shetty To Nayanthara Here

  जयाप्रदाचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी राजमुंदरी, आंध्र प्रदेशात झाला. तिचे खरे नाव ललिता राणी आहे. तिचे वडील कृष्ण राव तेलगु सिनेमांचे फायनान्सर होते. कमी वयातच जयाप्रदाच्या आईने तिला नृत्य आणि संगीताचे शिक्षण द्यायला सुरुवात केली होती. नृत्यकौशल्याच्या मुळे तिची अभिनय क्षेत्रात एन्ट्री झाली होती.  अमिताभ बच्चन आणि जितेंद्र या कलाकारांसोबतची तिची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.  जयाप्रदाने तिच्यी फिल्मी करिअरची सुरुवात 'भूमी कोसम' या तेलगू सिनेमाद्वारे केली होती. पण तिला ख-या अर्थाने यश बॉलिवूडमध्ये मिळाले.  

   

 • South Actress Real Name: Anushka Shetty To Nayanthara Here

  4 एप्रिल 1976 रोजी पंजाबी कुटुंबात सिमरन बग्गाचा जन्म झाला.  2002 साली आलेल्या 'पंचतंत्रम' या तामिळ सिनेमाद्वारे करिअरची सुरुवात करणा-या सिमरनचे नाव तिच्यापेक्षा वयाने 22 वर्षांनी मोठ्या कमल हासनसोबत जुळले होते. पण कमल आणि सिमरन यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. सिमरने 2 डिसेंबर 2003 राजी तिचा बालमित्र दीपक बग्गासोबत लग्न करुन संसार थाटला. तामिळ आणि तेलगू सिनेमांती स्टार सिमरनचे खरे नाव ऋषिबाला नवल आहे. तिला अधीप आणि आदित ही दोन मुले आहेत.  

   

 • South Actress Real Name: Anushka Shetty To Nayanthara Here

  सिल्क स्मिता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अतिशय बोल्ड अभिनेत्री होती. तिचा जन्म  2 डिसेंबर 1960 रोजी आंध्र प्रदेशातील एल्लुरू येथील एका अतिशय गरीब कुटुंबात झाला होता. तिचे खरे नाव विजयलक्ष्मी वडलापति होते. बोल्ड भूमिकांमुळे तिला सॉफ्ट पोर्न अॅक्ट्रेस म्हटले दात होते. सिल्क स्मिताच्या वादग्रस्त आयुष्यावर 2011 साली 'द डर्टी पिक्चर' बनवण्यात आला होता. यामध्ये विद्या बालनने लीड रोल साकारला होता. 23 सप्टेंबर 1996 रोजी सिल्क तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती.  

   

 • South Actress Real Name: Anushka Shetty To Nayanthara Here

  2016 मध्ये 'एमएस धोनी' या सिनेमात धोनी (सुशांत राजपूत) ची बहीण जयंती गुप्ताची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे भूमिका चावला. 'तेरे नाम' या सिनेमात निर्जराच्या भूमिकेतून भूमिका पहिल्यांदा लाइमलाइटमध्ये आली होती. 2007 मध्ये 'गांधी माई फादर' या सिनेमात ती शेवटची दिसली होती. 2007 नंतर तिने 'एमएस धोनी' या सिनेमाद्वारे हिंदीत कमबॅक केले. भूमिकाने तेलगु, भोजपुरी, पंजाबी आणि मल्याळम सिनेमेसुद्धा केले. 2007 साली योग गुरु भरत ठाकुरसोबत तिने लग्न केले. 2014 मध्ये तिने मुलाला जन्म दिला. भूमिकाने 'तेरे नाम'नंतर रन, दिल ने जिसे अपना कहा, सिलसिले, दिल जो भी कहे या हिंदी फिल्म्समध्ये काम केले. पण तिला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळू शकले नाही. 

   

 • South Actress Real Name: Anushka Shetty To Nayanthara Here

  तेलगु, तामिळ आणि कन्नड सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री रासीचे 'शुभकांक्षुलु' या तामिळ सिनेमातून डेब्यू झाले होते. 'गिरफ्तार' हा तिचा पहिला हिंदी सिनेमा होता. याशिवाय तिने रंगबाज, सूरज आणि जोडीदार या सिनेमांमध्ये मिथून चक्रवर्तीसोबत काम केले.

   

 • South Actress Real Name: Anushka Shetty To Nayanthara Here

  18 जुलै 1972 रोजी कर्नाटकातील कोलारमध्ये कन्नड सिनेमांचे लेखक के. एस. नारायण यांच्या घरी सौंदर्याचा जन्म झाला होता. 1992 साली 'गंधर्व' या कन्नड सिनेमाद्वारे तिने मोठ्या पडद्यावर डेब्यू केले होते. 12 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये सौंदर्याने 114 सिनेमे केले. एप्रिल 2004 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये तिचे निधन झाले. तिच्या निधनानंतर ऑगस्ट 2004 मध्ये 'Apthamitra' हा तिचा शेवटचा सिनेमा रिलीज झाला होता.  
   

Trending