T-20 / दक्षिण आफ्रिकेने भारताला 9 विकेट्सने पराभूत केले, तीन मॅचच्या सीरीजमध्ये 1-1 ने बरोबरी

भारताने दक्षिण आफ्रिलेला 134 रनाचे आव्हान दिले होते

Sep 23,2019 09:54:22 AM IST

बंगळुरू - डी कॉकच्या (७९*) अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने तिसऱ्या व अखेरच्या टी-२० सामन्यात यजमान भारतीय संघावर ९ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह द. आफ्रिकेने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.


नाणेफेक जिंकून भारतीय संघाने २० षटकांत ९ बाद अवघ्या १३४ धावा काढल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने १६.५ षटकांत १ बाद १४० धावा काढल्या. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताचा हा दुसरा पराभव ठरला. भारताच्या रोहित शर्मा व शिखर धवनने टीमला २ षटकांत २० धावा करत वेगवान सुरुवात करून दिली. मात्र, रोहित (९) टिकू शकला नाही. त्यानंतर धवनने २५ चेंडूंत सर्वाधिक ३६ धावा काढत डावाला पुढे नेले. मात्र तो बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला. विराट (९) देखील सामन्यात चालला नाही. ऋषभ पंत (१९), श्रेयस अय्यर (५) व कृणाल पांड्या (४) झटपट बाद झाले. रवींद्र जडेजा (१९) आणि हार्दिक पांड्या (१४) यांनी संघाला शंभरी गाठून दिली. मात्र, ते मोठी खेळी करू शकले नाहीत. अखेरच्या षटकात भारताने ३ गडी गमावले. आफ्रिकेच्या कगिसो रबाडाने ३ विकेट घेतल्या.

X