आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका अपघाताची तीन छायाचित्रे : मजुरास कारने दिली धडक, 12 फूट उंच उडूनही सुदैवाने बचावला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केपटाऊन :  ही छायाचित्रे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील आहेत. येथे सोमवारी एक मजूर रस्त्याने पायी चालला होता. त्याला ८० च्या वेगाने आलेल्या एका कारने धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त हाेती की हा ३२ वर्षीय मजूर झाेलेले फिंडेला सुमारे १२ फूट उंच उडाला. नंतर तो रस्त्यावर आपटला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


त्याला रुग्णालयात दाखल केलेल्या लिंडन डिमिलोन यांनी सांगितले, कार चालक एका ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा ही छायाचित्रे त्यांच्या कारमध्ये असलेल्या कॅमेऱ्यात बंदिस्त झाली.