आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • South Cinema Legends Appear With Amitabh Bachchan For Shooting Ad, Katrina Becomes Big B's Daughter

जाहिरातींच्या शूटिंगसाठी अमिताभसोबत दिसले साऊथ सिनेमाचे 3 दिग्गज, कतरिना बनली बिग बींची मुलगी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि कतरिना कैफ एका ब्रँड एंडोर्समेंटच्या जाहिरातीमध्ये केतर दिसणार आहेत. कतरिना कैफने अशातच नवरीच्या पोशाखातील आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले होते आणि तेव्हाच अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये शूटिंगदरम्यानचे काही फोटो शेअर केले. या फोटोमध्ये माता-पिता बनलेले अमिताभ आणि जया कतरिनाचे लग्न लावून देताना दिसत आहेत. कधी ते लग्नाच्या मंडपात तर कधी डान्स करताना दिसत आहेत.  

जाहिरातीमध्ये दिसतील साऊथ सिनेमाचे 3 दिग्गज

या जाहिरातीच्या शुटिंगचे फोटो बिग बींनी शेअर करून लिहिले, आणि काम आम्हाला लग्नात घेऊन गेले, सिंपल आणि अनेक भावनांनी भरपूर काम जे आम्ही एमच्या एका क्लायंटसाठी केले. पण माझ्या आणि जयासाठी ऐतिहासिक क्षण तो होता ज्यामध्ये इंडियन फिल्म इंडस्ट्रीचे दिग्गज आणि लेजेंड्री वडिलांच्या 3 सुपरस्टार मुलांची भेट झाली. 

बिग बींनी एक फोटो शेअर करून लिहिले, ''उजव्या बाजूला या फोटोमध्ये नागार्जुन आहेत जे लेजेंड्री अक्किनेनी नागेश्वर राव यांचे पुत्र आहेत. मग शिवराज कुमार उभे आहेत, जे कन्नड सिनेमाचे लेजेंड्री आणि आयकॉनिक डॉक्टर राज कुमार यांचे पुत्र आहेत आणि डाव्या बाजूला तमिळ सिनेमाचे लेजेंड्री आणि आयकॉनिक अभिनेते शिवाजी गणेशन यांचे पुत्र प्रभु देवा. आम्ही सर्व एका कॉमन क्लायंटसाठी काम करत आहोत. या सर्वांची भेट होणे ही माझ्यासाठी आणि जयासाठी भाग्याची गोष्ट आहे.''

बातम्या आणखी आहेत...