आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडक नियम आणि कायद्यांमुळे इंडस्ट्रीमध्ये कुप्रसिद्ध आहे हा अभिनेता, फिल्म साइन करण्यापूर्वीच क्लियर करतो, शूटिंगला येण्या जाण्याची वेळ 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'सिंघम' मध्ये जयकांत शिकरे हि भूमिका केलेला अभिनेता प्रकाश राज 54 वर्षांचा होणार आहे. 26 मार्च, 1965 ला जन्मलेल्या प्रकाश राजवर  फिल्ममेकर अनेकदा आरोप करतात की, तो शूटला कधीच वेळेवर येत नाही. यावर प्रकाश राजने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, तो कोणतीही फिल्म साइन करण्यापूर्वीच क्लियर करतो की, तो कोणत्या वेळी शूटसाठी सेटवर येईल. प्रकाश यांच्यानुसार, ''मी रात्री सुमारे 3 वाजता झोपतो आणि सकाळी 9 वाजता उठतो. मी कुणासाठीही माझ्या लाइफस्टाइलमध्ये चेंज करू शकत नाही. जर तुम्हाला मी आवडत असेल तर मला फिल्ममध्ये साइन करा नाहीतर काही हरकत नाही.'' 

तेलगु फिल्म इंडस्ट्रीने 6 वेळा केले आहे बॅन...
तेलगु फिल्म प्रोड्यूसर्सने प्रकाश राजवर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणे आणि त्याच्या गैरवर्तणुकीमुळे 6 वेळा त्याच्यावर बॅन लावला आहे. यावर प्रकाश राजचे म्हणणे आहे की, मी माझे नियम आणि कायदे फॉलो करतो आणि त्यापासून मागे हटत नाही. मात्र यावेळी त्याच्यावे लावलेल्या बॅनविषयी साउथ फिल्म इंडस्ट्री आणि मीडियामध्ये चर्चा आहे की, काही मोठे हीरो आणि प्रोड्यूसर्स यांनी मिळून त्याच्याविरुद्ध हा कट रचला आहे. कडक रूल फॉलो करणारा प्रकाश राज सध्या एका फिल्मसाठी 2 कोटी रुपये चार्ज करतो. 

ठेवला नाही मॅनेजर, फीस ते डेट सर्वकाही स्वतःच करतो डिसाइड...
प्रकाश राजने आजपर्यंत कुणीच मॅनेजर ठेवलेला नाही. त्यांच्यानुसार, तो आपली फीस स्वतःच डिसाइड करतो. प्रकाश म्हणतो, ''इंडस्ट्रीमध्ये मी एकटा आहे, ज्याने आजपर्यंत मॅनेजर नाही ठेवला. मी फोन कॉल अटेंड करण्यापासून ते फिल्म सिलेक्शन, स्टोरी आणि फीस सर्वकाही स्वतःच डिसाइड करतो. एवढेच नाही मी माझ्या कमाईतील 20 टक्के इन्कम दान करतो.''

एकेकाळी स्टेज शो करून 300 रुपये महिना कमवायचा...
प्रकाश राजने सुरुवातीच्या काळात थिएटरमध्ये काम केले. यासोबतच तो स्ट्रीट प्लेही करायचा. त्याने थिएटरमध्ये काम करण्यासाठी महिन्याचे 300 रुपये भेटायचे. यानंतर त्याने टीव्ही सीरियलमध्ये काम केले. हळुहळू तो चित्रपटांकडे वळला. त्याने कन्नड, तामिळ, मराठी, मल्याळी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. त्याने चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. जास्तीत जास्त चित्रपटात त्याने व्हिलनची भूमिका साकारली. त्याला अभिनयासाठी नॅशनल अवॉर्डही मिळाला आहे. त्याने चित्रपटांमध्ये अॅक्टिंग व्यतिरिक्त डायरेक्शनही केले आहे. त्याने चित्रपटांसाठी स्वतःचे नाव प्रकाश राय वरुन प्रकाश राज ठेवले होते.

12 वर्षांनी लहान मुलीसोबत लग्न करून 50 व्या वर्षी बनला पिता...
प्रकाश राजने 2010 मध्ये कोरियोग्राफर पोनी वर्मासोबत दूसरे लग्न केले. दोघांच्या वयामध्ये 12 वर्षांचे अंतर आहे. लग्नाच्या सहाव्या वर्षी 2016 मध्ये प्रकाश राज यांच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. यावेळी प्रकाश राज 50 वर्षांचे होते. त्याचे नाव वेदांत आहे. हे प्रकाश राजचे चौथे मुलं आहे. पोनीपुर्वी प्रकाशने 1994 मध्ये अभिनेत्री ललिता कुमारीसोबत लग्न केले होते. 2009 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दोघांना दोन मुली मेघना, पूजा आणि एक मुलगा सिधू आहे. परंतू हा मुलगा आता या जगात नाही.

बातम्या आणखी आहेत...