आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिच्यासोबत रजनीकांत- कमल हासनसारखे बडे स्टार्स काम करण्यास असायचे उत्सुक, शेवटच्या काळात मरणासन्न अवस्थेत आढळली होती रस्त्यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः फिल्म इंडस्ट्री कास्टिंग काऊच आणि सेक्शुअल हरॅसमेंटसारख्या प्रकरणांसाठी कुप्रसिद्ध आहे. हे असे एक सत्य आहे, जे नाकारुन चालणार नाही. एका अभिनेत्रीचे आयुष्य यामुळे उद्धवस्त झाले. ऐंशीच्या दशकातील अभिनेत्री निशा नूर हे नाव कदाचित तुम्हाला आठवत असावे. 1980 ते 1986 याकाळात निशा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री होती. असे म्हटले जाते की, निशाची लोकप्रियता एवढी होती की, रजनीकांत आणि कमल हासन यांच्यासारखे बडे स्टार्स तिच्यासोबत काम करण्यास उत्सुक असायचे. काही चित्रपटांमध्ये निशा या कलाकारांसोबत झळकलीसुद्धा. पण एका एका निर्मात्याच्या स्वार्थामुळे निशा एड्सला बळी पडली.  अखेरच्या काळात ती रस्त्यावर मरणासन्न अवस्थेत आढळली होती. 

 

निर्मात्याने ढकलले वेश्या व्यवसायात...
असे म्हटले जाते, की निशाला एका निर्मात्याने तिची फसवणूक करुन तिला वेश्या व्यवसायात ढकलले होते. याच काळात तिला एड्सची लागण झाली. त्यानंतर इंडस्ट्रीतील लोक तिच्यापासून दुरावले. इंडस्ट्रीने पाठ फिरवल्यानंतर निशाने ही इंडस्ट्री सोडून दिली. मात्र नंतर तिला अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. इंडस्ट्रीतून कुणी तिला बघायलादेखील आले नाही.

 

मृत्यूशी झुंज देताना आढळली होती रस्त्यावर....
हळूहळू निशाची आर्थिक परिस्थिती बेताची बनत गेली. शेवटच्या काळात तर तिची अवस्था इतकी बिकट बनली, की ती रस्त्यांवर भीक मागताना आढळली. याकाळात ती हळूहळू मृत्यूच्या दाढेत ओढली गेली होती. आजूबाजूच्या लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले असता तिला एड्स असल्याचे समोर आले. 2007 साली निशाने मृत्यूला कवटाळले. एका प्रसिद्ध वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा निशा नागोर दर्ग्याजवळ आढळली होती, तेव्हा तिच्या शरीराला किडे आणि मुंग्या लागल्या होत्या.

 

निशाचे गाजलेले सिनेमे...
कल्याण अगथिगल (1986), 'अय्यर द ग्रेट' (1990), टिक टिक टिक (1990), चुवाप्पू नाडा', 'मिमिक एक्शन 500' आणि 'इनिमई इधो' हे निशा नूरचे गाजलेले सिनेमे आहेत.

बातम्या आणखी आहेत...