आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकरौली (राजस्थान) - दक्षिण कोरिया की युवती हेमिन ली ने गुरुवारी रात्री करौलीच्या जितेंद्र मीनासोबत सप्तपदी घेऊन अनोखे लग्न केले. दोघांचे लग्न येथे हिंदू रीतिरिवाजानुसार संपन्न झाले. यादरम्यान विदेशी नवरीचे कुटुंबीय व नातेवाईकही हजर होते.
दोघेही आहेत सायंटिस्ट...
- वास्तविक, जितेंद्र मीना यांची पीएचडी करताना अमेरिकेतच्या येल युनिव्हर्सिटीत दक्षिण कोरियाच्या हेमिन लीशी भेट झाली होती. मैत्री आणि प्रेमानंतर दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या. मग शेवटी लग्नाचा निर्णय घेतला. दोन वेगवेगळ्या देशांचे नवरदेव व नवरीचे कुटुंबीय हे कल्चर, भाषा व इतर भेदांमुळे लग्नासाठी तयार होत नव्हते. परंतु अखेर दोघांच्या प्रेमापुढे कुटुंबीयांना हार मानावी लागली.
- आयुर्वेद विभागातून सुपरवायजर पदावरून निवृत्त झालेले वडील भैंरोसिंह यांचा जितेंद्र हा एकुलता एक मुलगा आहे. गुरुवारी दोघेही परिणय सूत्रात बांधले गेले. तरुणीचे आईवडील दक्षिण कोरियाहून आले आणि भारतीय परंपरेनुसार लग्नात सहभागी झाले.
- जितेंद्र मीना आणि हेमिन ली दोघेही शास्त्रज्ञ असून अमेरिकेत कॅन्सरवर संशोधन करत आहेत. अभ्यासानंतर यूएसएच्या ह्यूस्टनमध्ये जॉब केल्यानंतर दोघांनी जर्मनीतही एकत्रच नोकरी केली.
शिकताना झाली मैत्री, मग प्रेम अन् आता लग्न
जितेंद्र व हेमिन ली यांची लव्ह स्टोरी एखाद्या फिल्मी कहाणीपेक्षा वेगळी नाही. वास्तविक, 5 वर्षांपूर्वी जर्मनीच्या येल युनिव्हर्सिटीत शिक्षणादरम्यान हेमिन जितेंद्रच्या संपर्कात आली होती. भेटीगाठीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली. जी हळूहळू प्रेमात बदलली. करौलीच्या लक्ष्मी मॅरिज गार्डनमध्ये गुरुवारी रात्री दोघांचेही थाटामाटात लग्न पार पडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.